बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपला हृदयविकाराचा झटका, पार पडली अँजिओप्लास्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 11:51 AM2021-05-27T11:51:27+5:302021-05-27T11:52:02+5:30

अनुराग कश्यपचा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Bollywood director Anurag Kashyap undergoes heart attack, undergoes angioplasty | बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपला हृदयविकाराचा झटका, पार पडली अँजिओप्लास्टी

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपला हृदयविकाराचा झटका, पार पडली अँजिओप्लास्टी

googlenewsNext

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची मागील रविवारी तब्येत बिघडली. त्याच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची अँजिओप्लास्टी केली. आता हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा होते आहे.

ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, अनुराग कश्यपच्या छातीत आणि शरीर दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर डॉक्टरांनी चेकअप केले. लगेच अँजिओप्लास्टी केल्यानंतर समजले की अनुराग कश्यपच्या हृदयात ब्लॉकेज आहेत. त्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात सर्जरीसाठी दाखल केले.


अनुराग कश्यपच्या जवळच्या व्यक्तीने सूत्रांना माहिती दिली की, सध्या अनुरागची सर्जरी झाली आहे आणि तो आधीपेक्षा बरा आहे. हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा होते आहे. डॉक्टरांनी एक आठवडा आराम करायला सांगितले आहे. त्यानंतर अनुराग काम करण्यासाठी सज्ज होऊ शकतो.


वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अनुराग कश्यपचा दोबारा चित्रपट पाइपलाईनमध्ये आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. मनमर्जिया चित्रपटानंतर अनुराग आणि तापसी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे सध्या काम सुरू आहे.


आयकर विभागाच्या छापा प्रकरणानंतर अनुराग कश्यप वृत्तांपासून दूर आहे. ट्विटरवर नेहमी सक्रीय असणाऱ्या अनुरागची लेक आलिया कश्यपदेखील त्याच्यासारखी सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे. ती सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहत असते.

Web Title: Bollywood director Anurag Kashyap undergoes heart attack, undergoes angioplasty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.