ठळक मुद्देएका प्रसिद्ध फोटोग्राफरचे कॅलेंडर दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील चर्चेत आले आाहे. याचे कारण म्हणजे कियारा आडवाणी, सनी लियोनी आणि भूमि पेडणेकर या तारकांचा टॉपलेस अंदाज या अगोदरही काही अभिनेत्र्या फोटोशूटसाठी टॉपलेस झाल्या आहेत.

-रवींद्र मोरे
एका प्रसिद्ध फोटोग्राफरचे कॅलेंडर दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील चर्चेत आले आाहे. बऱ्याच तारका फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या अंदाजात दिसल्या. मात्र सर्वात जास्त चर्चा तीन अभिनेत्रींच्या लुकची झाली. याचे कारण म्हणजे या तारकांचा टॉपलेस अंदाज होय. कियारा आडवाणी, सनी लियोनी आणि भूमि पेडणेकर ह्या त्या तीन अभिनेत्र्या असून यांनी टॉपलेस फोटोशूट करत चर्चेला उधाण आणले. या अगोदरही काही अभिनेत्र्या फोटोशूटसाठी टॉपलेस झाल्या आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबाबत...

* आलिया भट्ट


बॉलिवूडची चुलबूली अभिनेत्री आलिया भट्टने कमी वेळेत इंडस्ट्रीत पाय रोवले. ती यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणली जाऊ लागली आहे. २०१७ मध्ये आलिया एका कॅलेंडरमध्ये टॉपलेस दिसली होती. या फोटोत आलिया एक काळी मांजर पकडलेली दिसत होती. आलियाच्या या फोटोमुळे खूपच चर्चा रंगल्या होत्या.

* दीपिका पादुकोण


एकामागे एक हिट चित्रपट देत बॉलिवूडमध्ये आपला दबदबा कायम करणारी दीपिका पादुकोणनेही २०१७ मध्ये टॉपलेस फोटोशूट केले होते. या फोटोत दीपिका एका काउचवर बसलेली दिसत होती. विशेष म्हणजे या फोटोत दीपिकाच्या चेहऱ्याचे भाव जबरदस्त होते.

* दिशा पाटनी


लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन बनलेली दिशादेखील २०१७ मध्ये बोल्ड लुकमध्ये दिसली होती. या फोटोत दिशाने काळ्या रंगाचे बूट घातले होते. दिशाचा हा टॉपलेस फोटोदेखील खूपच चर्चेत आला होता.

* विद्या बालन


विद्या बालनदेखील एकदा एका कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. या फोटोत विद्या हातात एक कॉफी कप घेऊन एक वृत्तपत्र वाचताना दिसत होती. सोबतच मोकळे केस आणि चेहऱ्यावर गॉगल लावला होता. तिने हा फोटोशूट २०१७ मध्ये केला होता.

* परिणीति चोप्रा


या यादीत परिणीति चोप्रादेखील समावेश आहे. तिनेही टॉपलेस फोटोशूट करुन सर्वांना चकित केले होते. एका फोटोत ती एका ट्रॉलीत टॉपलेस बसलेली दिसत होती.

* श्रद्धा कपूर


श्रद्धा कपूरनेही २०१७ मध्ये एका कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोेशूट केले होते. या टॉपलेस फोटोत तिचे मोकळे केस हवेत उडताना दिसत होते. या फोटोचीही त्यावेळी खूप चर्चा झाली होती.

* क्रिती सॅनन


क्रितीदेखील या कॅलेंडर फोटोशूटसाठी टॉपलेस झालेली आहे. या फोटोत ती हातात टोपी पकडताना दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्याचे भावदेखील जबरदस्त दिसत आहेत.

Web Title: Bollywood celebs who went topless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.