bollywood celebs support an open letter against rhea chakraborty media trial | तुम्ही ठीक आहात ना? सोनम कपूर, अनुराग कश्यपसह बॉलिवूड सेलिब्रिटींचे मीडियाला खुले पत्र

तुम्ही ठीक आहात ना? सोनम कपूर, अनुराग कश्यपसह बॉलिवूड सेलिब्रिटींचे मीडियाला खुले पत्र

ठळक मुद्देरिया चक्रवर्तीला एनसीबीने ड्रग्जप्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला यायालयीन कोठडी  सुनावली आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली. रियाच्या अटकेनंतर तिला सपोर्ट करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी काहीसे शांत बसले होते. मात्र आता अचानक बॉलिवूडचे सेलिब्रिटी रियाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. या सर्वांनी मीडियाच्या नावे एक खुले पत्र लिहिले आहे. सुशांतप्रकरणी रियाला दिल्या जात असलेल्या वागणुकीवर या सेलिब्रिटींनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मीडियाच्या नावे लिहिलेल्या या खुल्या पत्रावर सोनम कपूर, झोया अख्तर, अनुराग कश्यप, अमृता सुभाष, रसिका दुग्गल, मिनी माथुर आदी सेलिब्रिटींच्या स्वाक्ष-या आहेत.
 ‘feminist voices’ नामक एका ब्लॉगवर हे खुले पत्र प्रकाशित करण्यात आले आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींसह सुमारे 2500 लोकांच्या या पत्रावर स्वाक्ष-या आहेत. 60 संघटनांनीही या पत्राला पाठींबा दिला आहे.

असे आहे पत्र

डिअर न्यूज मीडिया ऑफ इंडिया,
आम्हाला तुमची चिंता वाटतेय, तुम्ही ठीक आहात ना? कारण मीडिया ज्याप्रकारे रिया चक्रवर्तीच्या मागे पडलेला आहे, त्यावरून  तुम्ही पत्रकारितेचे प्रत्येक नैतिक मूल्य विसरलेत की काय, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. एका महिलेची प्रतिष्ठा राखण्याऐवजी तुम्ही कॅमेरे घेऊन तिच्यावर हल्ला करत आहात. तिच्या गोपनियतेचे उल्लंघन करत आहात आणि खोट्या आरोपांवर दिवस-रात्र काम करत आहात. ‘रिया को फंसाओं’ ड्रामा सुरु आहे. एक तरूण महिला जी स्वत:चे निर्णय स्वत: घेते, जी लग्नाआधी आपल्या प्रियंकासोबत राहते, जी संकटाच्या काळात अभिनय करण्याऐवजी स्वत:साठी उभी होते, तिला चौकशीविना, कायदेशीर प्रक्रियेविना थेट आरोपी ठरवले जाते. सलमान खान आणि संजय दत्त प्रकरणात आम्ही मीडियाचा दयाळूपणा आणि सन्मानजनक भूमिका पाहिली आहे. मात्र एका महिला जिच्यावरचा गुन्हा अद्याप सिद्ध व्हायचा आहे, तिच्या चारित्र्यावर वारंवार हल्ला केला जात आहे. तिच्यावर आणि तिच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यासाठी सोशल मीडियावरच्या लोकांना चिथवले जातेय. शिवाय तिच्या अटकेला विजय मानले जातेय. हा खरोखर विजय आहे? आम्ही पाहतोय की, तुम्ही रिया चक्रवर्तीच्या मागे पडले आहात.

म्हणून रियाला पाठींबा, अनुराग कश्यपने सांगितले होते कारण
रिया चक्रवर्तीला एनसीबीने ड्रग्जप्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला यायालयीन कोठडी  सुनावली आहे.  एनसीबीच्या या कारवाईवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती़ रियाला पाठिंबा देणा-या या कलाकारांवर सध्या सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. अलीकडे या टीकाकारांना दिग्दर्शक अनुराग कश्यप याने प्रत्युत्तर दिले होते. रियाला पाठिंबा का दिला जातोय? याचेकारण त्याने सांगितले होते.
‘रियाला शिक्षा व्हावी अशी तुमची इच्छा आहे. पण हे आरोप तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारावर करत आहात. रिया गुन्हेगार आहे, हे तुम्हाला कसे कळले? रियाला होणा-या मानसिक त्रासाचा तुम्हाला अंदाज लावता येणार नाही. आम्ही सुशांतला गेल्या १० वर्षांपासून ओळखतोय. याच इंडस्ट्रीमध्ये तो काम करत होता. आम्ही सुशांतला तुमच्यापेक्षा जास्त ओळखत होतो त्यामुळे आम्ही शांत राहिलो. पण आता गोष्टी खूपच पुढे निघून गेल्या आहेत. त्यामुळे आम्ही रियाला पाठिंबा देतोय, अशा आशयाचे ट्विट करुन अनुराग कश्यपने केले होते.

फक्त मनोरंजनासाठी रियाचे आयुष्य पणाला लावू नका..! ट्विंकल खन्ना ‘मीडिया ट्रायल’वर भडकली

In Pics: संजय, सलमान ते अक्षय कुमार... रिया नाही तर या सेलिब्रिटींनी देखील झाली आहे अटक

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bollywood celebs support an open letter against rhea chakraborty media trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.