In Pics: संजय, सलमान ते अक्षय कुमार... रिया नाही तर या सेलिब्रिटींनी देखील झाली आहे अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 06:33 PM2020-09-13T18:33:50+5:302020-09-13T18:49:42+5:30

अशी झाली करिअरची अवस्था...

सुशांत सिंग प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक झाली आहे. रियाच नाही तर यापूर्वी बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी जेलची हवा खाल्ली आहे. त्यावर एक नजर

संजय दत्त - 1993 च्या बॉम्बस्फोटात अवैध शस्त्र बाळगणा-या संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने 5 वषार्ची शिक्षा सुनावली होती. त्याने ही शिक्षा भोगली आणि फेबु्रवारी 2016 मध्ये तुरुंगाबाहेर आला. यानंतर 2017 मध्ये त्याने ‘भूमी’ सिनेमातून वापसी केली. चाहत्यांनी खुल्या मनाने संजयला स्वीकारले. सध्या त्याच्याकडे शमशेरा, ब्रह्मास्त्र, केजीएफ 2, पृथ्वीराज, भूज आणि तोरबाज असे अनेक सिनेमे आहेत.

फरदीन खान - फिरोज खान यांचा मुलगा आणि अभिनेता फरदीन खान याने 1998 मध्ये ‘प्रेम अगन’ या सिनेमाद्वारे डेब्यू केला होता. याच फरदीनला कोकेन बाळगण आणि त्याचा सप्लाय करण्याच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खावी लागली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या करिअरवर फार काही परिणाम झाला नाही. यानंतरही त्याने अनेक सिनेमांत काम केले. अर्थात तो सुपरस्टार बनू शकला नाही. सततच्या फ्लॉप सिनेमांमुळे तो इंडस्ट्रीपासून कायमचा दुरावला.

जॉन अब्राहम - 2006 साली जॉनच्या बाईकने एका सायकलस्वाराला धडक दिली होती. यात दोन लोक जखमी झाले होते. यानंतर अनियंत्रित पद्धतीने वाहन चालवल्याबद्दल जॉनला दंड भरावा लागला होता. शिवाय 15 दिवस तुरूंगवास भोगावा लागला होता. अर्थात याचा त्याच्या करिअरवर काहीही फरक पडला नाही. त्याने यानंतरच्या काळात एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत.

सलमान खान - सलमान खानला हिट अ‍ॅण्ड रन केस आणि काळवीट शिकार प्रकरणी तुरुंगात जावे लागले होते. मात्र याचा सलमानच्या लोकप्रियतेवर काहीही वाईट परिणाम झाला नाही. तो आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. त्याचा चित्रपट येताच चाहत्यांच्या त्याच्या सिनेमावर उड्या पडतात.

सैफ अली खान - सैफ अली खानला 2012 साली ताज हॉटेलमध्ये मारहाण केल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यावेळी त्याला कलम 325 अंतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली होती.

शायनी अहुजा - 2005 मध्ये ‘ख्वाहिशें ऐसी’ या सिनेमातून डेब्यू करणारा अभिनेता शायनी अहुजाचे करिअर फार खास नव्हते. 2009 मध्ये त्याच्या त्याच्या मोलकरणीने बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्याला तुरूंगात जावे लागले होते, या प्रकरणानंतर शायनीला काम मिळणे बंद झाले. सध्या तो बॉलिवूडमधून जणू गायब झाला आहे.

राजपाल यादव - बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कॉमेडियन राजपाल यादव याला अलीकडे 5 कोटींचे लोन न चुकवल्याबद्दल 3 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.

सूरज पांचोली - वडील आदित्य पांचोलीप्रमाणे सूरज पांचाली सतत वादात राहिला. अभिनेत्री जिया खान आत्महत्याप्रकरणी त्याला कोर्ट आणि जेलच्या फे-या माराव्या लागल्या होत्या. 2015 मध्ये फिल्मी करिअरची सुरुवात करणा-या सूरजचे करिअर फार चालले नाहीत. अद्याप त्याला एकही हिट सिनेमा देता आलेला नाही.

अक्षय कुमार 2009 मध्ये लॅक्मे फॅशन वीकदरम्यान अक्षय कुमार रॅम्प वॉक करत होता. अचानक तो रॅम्प वॉक करत समोर प्रेक्षकांमध्ये बसलेली पत्नी ट्विंकल खन्नाजवळ जाऊन तिच्याजवळ जाऊन उभा राहिला आणि त्याने जीन्सच्या बटणाकडे इशारा केला. अक्षयने ट्विंकलला जीन्सचे बटण उघडण्यास सांगितले. थोडा वेळ थांबून तिने खिलाडी कुमारच्या जीन्सचे बटण उघडले होते़. या प्रकरणावरून मोठा वाद झाला होता व याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे अक्षय कुमारला जेल जावे लागले होते. अर्थात त्याला लगेच जामीन मंजूर झाला होता. काही काळानंतर या वादावर पडदा पडला. अक्षयचे करिअरही होते तसे सुुरू राहिले.