हनीमूनसाठी गेलेल्या ऐश्वर्याला पडला नवऱ्याचा विसर; वाटेतच सोडली होती अभिषेकची साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:15 PM2021-09-15T19:15:00+5:302021-09-15T19:15:00+5:30

Abhishek and aishwarya rai bachchan: लग्नाच्या वेळी ऐश्वर्या ३४ वर्षांची होती. तर, अभिषेक ३१ वर्षांचा. त्यामुळे त्यांच्या वयातील अंतरामुळे हे लग्न फार काळ टिकणार नाही अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती.

bollywood abhishek bachchan revealed the honeymoon trip story with aishwarya rai bachchan | हनीमूनसाठी गेलेल्या ऐश्वर्याला पडला नवऱ्याचा विसर; वाटेतच सोडली होती अभिषेकची साथ

हनीमूनसाठी गेलेल्या ऐश्वर्याला पडला नवऱ्याचा विसर; वाटेतच सोडली होती अभिषेकची साथ

Next
ठळक मुद्देलग्नानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या डिस्नेलँडला गेले होते

बॉलिवूडचं ऐश्वर्य अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या रायने २००७ साली अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या वेळी ऐश्वर्या ३४ वर्षांची होती. तर, अभिषेक ३१ वर्षांचा. त्यामुळे त्यांच्या वयातील अंतरामुळे हे लग्न फार काळ टिकणार नाही अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. मात्र, या दोघांनी तब्बल १५ वर्ष संसार करुन दाखवला आहे. या १५ वर्षाच्या काळात त्यांच्या जीवनात अनेक गोष्टी घडून गेल्या. यापैकी काही त्यांनी चाहत्यांसोबतही शेअर केल्या आहेत. यामध्येच त्यांनी त्यांच्या हनीमुनला घडलेले काही मजेशीर किस्सेही मुलाखतींमध्ये सांगितले होते. विशेष म्हणजे यातलाच एक किस्सा म्हणजे हनीमुनमध्ये अ‍ॅशने चक्क अभिषेकला वाटेत सोडून दिलं होतं.

लग्नानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक डिस्नेलँडमध्ये फिरायला गेले होते. मात्र, तिथे गेल्यानंतर ऐश्वर्याने चक्क अभिषेकला वाटेत सोडून दिलं. याविषयीचा खुलासा खुद्द अभिषेकने एका मुलाखतीत केला आहे.

"लग्नानंतर मी आणि ऐश्वर्या डिस्नेलँडला गेलो होतो. मात्र, तिथे गेल्यावर तिने मला वाटेत सोडून दिलं. आणि, ती मिकी-मिनी माऊससोबत पोझ देत बसली. पण, त्यावेळी आम्ही तो काळ खूप एन्जॉय केला", असं अभिषेक म्हणाला. 

Met Gala 2021: सेलिब्रिटींना डिनरमध्ये कोणते पदार्थ देतात माहितीये का?

दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लव्हमॅरेज असून 'गुरु' चित्रपटाच्यावेळी त्यांचं सूत जुळलं. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम न्यूयॉर्कला गेली असताना अभिषेकने हॉलिवूडच्या फिल्मी स्टाइलमध्ये गुडघ्यावर बसून ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bollywood abhishek bachchan revealed the honeymoon trip story with aishwarya rai bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app