एकेकाळी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचे वजन ९० किलो होते. मात्र आता तिने वजन घटविले असून दिवसेंदिवस ती जास्त ग्लॅमरस दिसते आहे. भूमी अभिनयाव्यतिरिक्त स्टाईल स्टेटमेंटमुळेदेखील चर्चेत येत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर बाथटबमधील न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोंवर कमेंट्स व लाईक्सचा वर्षाव होतो आहे.


भूमी पेडणेकर हिने इंस्टाग्रामवर बाथटबमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती बाथटबमध्ये न्यूड दिसते आहे. या फोटोत ती खूपच सेक्सी व बोल्ड दिसते आहे. खरेतर तिने फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या २०२० च्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे.


बॉलिवूडमध्ये भूमीने २०१४ साली दम लगा के हईशा चित्रपटातून पदार्पण केले आहे. तिने ज्यावेळी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला तेव्हा तिचे वजन ९० किलो होते. मात्र आता ती फिट झाली असून दिवसेंदिवस ग्लॅमरस दिसते आहे.

याबाबत भूमी म्हणाली की, मी साईज किंवा रंगामुळे कधीच स्वतःला कमी लेखलं नाही. मी स्वतःला नेहमीच सेक्सी समजलं आहे. ज्यावेळी माझं वजन ९० किलो वजन होते त्यावेळी देखील स्वतःला आकर्षक समजत होते. त्यावेळी देखील मी छोटे कपडे परिधान करत होते आणि क्लीवेज दाखवतानादेखील अनकंम्फर्टेबल समजत नव्हते.


भूमी पेडणेकर मागील वर्षी सोनचिरैया, साँड की आँख, बाला व पती पत्नी ओर वो चित्रपटात झळकली आहे. त्यातील तिच्या भूमिकेचं सर्वत्र खूप कौतूक झाला.

आता ती भूत व शुभ मंगल ज्यादा सावधानमध्ये झळकणार आहे. भूत चित्रपटात भूमी विकी कौशलसोबत दिसणार आहे आणि शुभ मंगल ज्यादा सावधानमध्ये ती आयुषमान खुराणासोबत पहायला मिळणार आहे.

Web Title: Boldness Overloaded! Bhumi Pednekar shared the nude photo in the bathtub, see photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.