ठळक मुद्दे अभिनेत्री गीता बसरा हिनेही आपल्या करिअरच्या सुरुवातीला बोल्ड अवताराने प्रेक्षकांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.

बॉलिवूडच्या ग्लॅमरस आयुष्याला भुलणारे अनेक आहेत. या ग्लॅमरस आयुष्याला भुलून अनेकजण बॉलिवूडमध्ये येतात आणि येतात तसेच दिसेनासे होतात. या यादीत अनेक बोल्ड अभिनेत्रींची नावे घेता येतील. बोल्डनेसच्या जोरावर अनेकजणी सिनेसृष्टीत आल्या. नाही म्हणायला आपल्या बोल्डनेसनी त्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. पण सरतेशेवटी या अभिनेत्रींना कुणीच फारसे गांभीर्याने घेतले नाही. मग काय, त्या आल्या तसा बॉलिवूडमधून गायब झाल्यात. अशाच काही अभिनेत्रींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

२००४ मध्ये फेमिना मिस इंडिया किताब आपल्या नावावर केल्यानंतर तनुश्री दत्ताने बॉलिवूडची वाट धरली. तिने ‘आशिक बनाया आपने’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमात तिने इमरान हाश्मीसोबत अनेक बोल्ड सीन दिले. हा तिचा पहिला आणि शेवटचा हिट होता. यानंतर तनुश्रीने कमबॅक करण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यात तिला फारसे यश मिळाले नाही. चित्रपटांपेक्षा आपल्या कॉन्ट्रोवर्सीमुळेच ती अधिक चर्चेत राहिली.


 
अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी रिया सेन आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री अशी ओळख निर्माण करून इंडस्ट्रीत पाय रोवण्याचे तिने बरेच प्रयत्न केलेत. पण तिचे सगळे प्रयत्न फसले.

 आपल्या पहिल्याच चित्रपटात मल्लिकाने एक नाही, दोन नाही तर तब्बल 17 किसींग सीन्स दिलेत. या चित्रपटाचे नाव होते, ख्वाहिश. या चित्रपटामुळे मल्लिका चर्चेत आली. यानंतर ‘मर्डर’मध्ये तिला सुपर हॉट लूक दिसला. हा चित्रपट सुपरहिटही झाला. पण तरीही बोल्ड मल्लिका फार काळ बॉलिवूडमध्ये टिकली नाही.

मिस इंडियाचा किताब जिंकणारी सेलिना जेटलीने २००३ मध्ये‘जानशीन’ सिनेमातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. या सिनेमात फरदीन खानसोबत तिने अनेक बोल्ड सीन दिले. यानंतरच्या तिच्या सिनेमातही ती बोल्ड रूपात दिसली. पण करिअरमध्ये या बोल्डनेसचा तिला फार फायदा झाला नाही.

 

 अभिनेत्री गीता बसरा हिनेही आपल्या करिअरच्या सुरुवातीला बोल्ड अवताराने प्रेक्षकांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर अभिनेत्रींप्रमाणे तिलाही यात फारसे  यश आले नाही. लग्नाआधी तिने अनेक सिनेमांत काम केले पण तिच्या पदरी अपयशच पडले.
 

Web Title: bold and glamorous bollywood actress career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.