ठळक मुद्देकतरिना  कैफला लॉन्च करण्याचा निर्णय जॅकींनी घेतला.  एवढ्या सुंदर अभिनेत्रीला लॉन्च केल्यास तरुण पिढी तिला बघण्यासाठी नक्कीच सिनेमागृहात पोहोचेल, असा त्यांचा कयास होता.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस. कॅट आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करतेय. गेल्या 17 वर्षांपासून ती इंडस्ट्रीत आहे आणि या 17 वर्षांत तिने फार मोठा पल्ला गाठला आहे. सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान, अक्षय कुमार अशा अनेक सुपरस्टार्ससोबत तिने काम केले.
याच कतरिनाबद्दल एक गोष्ट कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. होय, याच कतरिनाच्या नादात जॅकी श्रॉफ यांना त्यांचा बंगला गहाण ठेवावा लागला होता.
तर  जॅकीदाच्या करिअरमध्ये एक काळ असा आला जेव्हा त्यांच्याकडे एकही चित्रपट नव्हता. शिवाय त्यांना कास्ट करण्यात कोणालाही रस नव्हता. अशात जॅकी श्रॉफ यांनी स्वत:च एक चित्रपट प्रोड्यूस करण्याचा विचार केला. हा चित्रपट दुसरा-तिसरा कुठलाही नसून,कतरिना कैफ हिचा डेब्यू  सिनेमा ‘बूम’   होता. 

या चित्रपटाच्या माध्यमातून  कतरिना  कैफला लॉन्च करण्याचा निर्णय जॅकींनी घेतला.  एवढ्या सुंदर अभिनेत्रीला लॉन्च केल्यास तरुण पिढी तिला बघण्यासाठी नक्कीच सिनेमागृहात पोहोचेल, असा त्यांचा कयास होता. मात्र जॅकीदांचा हा डाव नेमका फसला.  सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला पहिला जोरदार धक्का  दिला. सेन्सॉर या चित्रपटाला बी ग्रेड चित्रपटांच्या कॅटेगिरीमध्ये टाकले. कारण चित्रपटात खूपच इंटीमेट सीन्सचा भडीमार  होता. 


  
चित्रपटात कतरिनाने गुलशन ग्रोव्हरसोबत खूपच बोल्ड आणि इंटीमेट सीन्स दिले होते. त्यामुळेच सेन्सॉरने चित्रपटाला बी ग्रेड दर्जा दिला होता. सेन्सॉर बोर्डाचा हा निर्णय जॅकी दांसाठी अनपेक्षित होता. त्यामुळे जॅकीदाने केलेल्या सर्व मेहनतीवर एकर्प्रकारे पाणी फिरले. अशात जॅकी दा यांना दुसरा धक्का बसला. होय, हा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच लीक झाला. त्यामुळे जॅकीदाच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही पाण्यात वाहून गेल्या. त्यावेळी जॅकीदाने इंडस्ट्रीतील त्यांच्या अनेक मित्रांकडे मदतीसाठी हात पसरले. परंतु कोणीही त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले नाही. 

अखेर जॅकी श्रॉफ यांना त्यांचा बंगला गहाण ठेवला. त्यांच्या या चित्रपटाला डिस्ट्रिब्यूटर्सही खरेदी करण्यास तयार नव्हते.  या चित्रपटानंतर जॅकी आणि कतरिना या दोघांच्या नात्यात मतभेद निर्णाण झाले होते. एकंदर काय तर कतरिनाचे करिअर घडविण्याच्या नादात स्वत: जॅकी श्रॉफ बरबाद झाले होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: birthday special jackie shroff produce the film boom with katrina kaif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.