Hindustani Bhau: ‘बिग बॉस’ फेम हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी केली अटक, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 06:35 PM2021-05-08T18:35:35+5:302021-05-08T18:36:52+5:30

'बिग बॉस' या 'रिआलिटी शो'चा माजी स्पर्धक आणि सोशल मीडियावर 'हिंदुस्थानी भाऊ' (Hindustani Bhau) म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक (Vikas Pathak) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Bigg Boss fame Hindustani Bhau arrested by Mumbai police | Hindustani Bhau: ‘बिग बॉस’ फेम हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी केली अटक, नेमकं कारण काय?

Hindustani Bhau: ‘बिग बॉस’ फेम हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी केली अटक, नेमकं कारण काय?

Next

'बिग बॉस' या 'रिआलिटी शो'चा माजी स्पर्धक आणि सोशल मीडियावर 'हिंदुस्थानी भाऊ' (Hindustani Bhau) म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक (Vikas Pathak) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पापाराजी विराल भयानीनं इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आहे. 

"हिंदुस्थानी भाऊ मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन करत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इयत्ता 12वीच्या मुलांची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंदुस्थानी भाऊ आंदोलन करत होता. याशिवाय सरकारनं मुलांची शालेय फी माफ करावी, अशी मागणी देखील करत हिंदुस्थानी भाऊ आंदोलन करत होता", असं विशाल भयानीच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.  (Hindustani Bhau arrested by Mumbai police for violating section 144 rules)

हिंदुस्थानी भाऊ सोशल मीडियात आपल्या व्हिडिओंसाठी खूप प्रसिद्ध आहे. रोखठोक आणि बेधडक भूमिकेसाठी हिंदुस्थानी भाऊची तरुणाईमध्ये खूप क्रेझ आहे. यावरुनच त्याची बिग बॉससाठी निवड झाली होती. या कार्यक्रमातही 'हिंदुस्थानी भाऊ'नं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. देशाविरोधात भाष्य कऱणाऱ्यांना 'हिंदुस्तानी भाऊ' त्याच्या शैलीत फिरकी घेतो. भाऊचे टिकटॉकवर 6 लाख फॉलोअर्स होते, तर यूट्युबवर तब्बल 10 लाखांपेक्षा अधिक सबस्क्राइबर्स आहेत. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss fame Hindustani Bhau arrested by Mumbai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app