'अतरंगी रे'चा ट्रेलर शेअर करताना अक्षय कुमारकडून झाली मोठी चूक, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 10:12 PM2021-11-24T22:12:30+5:302021-11-24T22:13:07+5:30

अक्षय कुमारची चूक नेटकऱ्यांच्या लक्षात येताच सोशल मीडियावर अभिनेत्याला केले ट्रोल

Big mistake made by Akshay Kumar while sharing trailer of 'Atarangi Re', netizens trolled | 'अतरंगी रे'चा ट्रेलर शेअर करताना अक्षय कुमारकडून झाली मोठी चूक, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

'अतरंगी रे'चा ट्रेलर शेअर करताना अक्षय कुमारकडून झाली मोठी चूक, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

googlenewsNext

आनंद एल रायचा बहुप्रतीक्षीत चित्रपट अतरंगी रेचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या अतरंगी रेचा ट्रेलर सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. अतरंगी रेचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करताना अक्षय कुमारकडून मोठी चूक झाली. त्याची ही चूक कुणापासून लपून राहू शकली नाही. त्याची चूक नेटकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली.

अक्षय कुमारने ट्विटरवर अतरंगी रेचा ट्रेलर शेअर केला होता. शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच अक्षय कुमारला ही पोस्ट डिलीट करावी लागली होती. खरेतर हा ट्रेलर पोस्ट करताना अक्षय कुमारने चित्रपटाशी निगडीत सर्वांना टॅग केले होते. घाईघाईत पोस्ट शेअर करण्याच्या गडबडीत अक्षय कुमारने चित्रपटातील सहकलाकार धनुषला टॅग करालाच विसरला. जेव्हा त्याला या चुकीची जाणीव झाली तोपर्यंत खूप वेळ निघून गेला होता. अक्षयच्या चाहत्यांना त्याची चूक लक्षात आली आणि त्यांनी ट्रोल करायला सुरूवात केली.


अतरंगी रेचा ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांनी अक्षय कुमारचे खूप कौतुक केले. ट्रेलरमध्ये अक्षय कुमारने ज्या अंदाजात एन्ट्री केली, ती लोकांना खूप भावली. काही लोकांनी धनुषला टॅग केले नाही म्हणून टार्गेट केले. एकाने म्हटले की, काय अक्षय पाजी तुम्ही ही चूक कशी काय करू शकता?
अतरंगी रेचा ट्रेलर लोकांना खूप भावला आहे. हा चित्रपट २४ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Web Title: Big mistake made by Akshay Kumar while sharing trailer of 'Atarangi Re', netizens trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.