bhumi pednekar grandfather dies actress remember him by emotional letter | आजोबांच्या निधनाचे दु:ख विसरून या अभिनेत्रीने लावली ट्रेलर लॉन्च इव्हेंटला हजेरी
आजोबांच्या निधनाचे दु:ख विसरून या अभिनेत्रीने लावली ट्रेलर लॉन्च इव्हेंटला हजेरी

ठळक मुद्देभूमीचा ‘सांड की आंख’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात भूमीसोबत तापसी पन्नू ही सुद्धा मुख्य भूमिकेत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्यासाठी रविवारी एक वाईट बातमी आली. भूमीचे आजोबा (आईचे वडील) मेजर ध्यानचंद हुड्डा यांचे निधन झाले. भूमीने स्वत: सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहून ही दु:खद बातमी सर्वांशी शेअर केली. विशेष म्हणजे, या दु:खातून सावरत भूमी सोमवारी तिचा आगामी चित्रपट ‘सांड की आंख’च्या ट्रेलर लॉन्चला हजर राहिली.
भूमीने आजोबांसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोत भूमी, तिचे आजोबा, तिची आई आणि बहीण असे सगळे दिसत आहेत.

हा फोटो शेअर करताना तिने लिहिले, ‘मला आठवते, मी लहान असताना तुम्हाला म्हणायचे, नाना, मला तुम्ही कडेवर घेता ना. मी मोठी झाली की, तुम्हालाही असेच कडेवर घेईल. हा किस्सा तुम्ही गमतीने सगळ्यांना सांगायचे. आज मी तुमच्याबद्दल आणि तुम्ही आम्हाला सर्वांना दिलेल्या प्रेमाबद्दल विचार करत होते. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात आपण जयपूरमध्ये घालवलेले दिवस. आम्ही तुम्हाला आर्मी युनिफॉर्ममध्ये पाहायचो. तुमच्या शरीरावरचे गोळी लागल्याचे निशान बघून, तुम्हाला हे कसे मिळाले, असे विचारायचो. नाना-नानी मला इतके सुंदर बालपण देण्यासाठी आभार. तुम्ही कायम माझ्यासोबत असाल. तुमच्या आठवणी माझ्या मनात कायम राहतील. येणा-या पिढीला त्या आठवणी मी सांगेल. तुमच्या आत्म्याला शांती लाभो... माझे आयुष्य तुम्हाला समर्पित नाना....’ 


भूमीचा ‘सांड की आंख’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात भूमीसोबत तापसी पन्नू ही सुद्धा मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलर लॉन्च इव्हेंटला भूमी व तापसी दोघीही हजर होत्या. हा चित्रपट शूटर दादींवर आधारित आहे.

English summary :
Actress Bhumi Pednekar's grandfather Major DhyanChand Hooda died. Bhumi wrote an emotional post on social media and shared the sad news with everyone.


Web Title: bhumi pednekar grandfather dies actress remember him by emotional letter
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.