बाटला हाऊसला हा चित्रपट देतोय टक्कर, 100 करोडच्या क्लबमध्ये एंट्री मारणार का जॉनचा हा चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 03:16 PM2019-08-31T15:16:16+5:302019-08-31T15:19:05+5:30

बाटला हाऊस या चित्रपटाने आतापर्यंत 91.76 करोड इतकी कमाई केली आहे. या चित्रपटाने 100 करोडची कमाई करण्यासाठी आता काही करोडची गरज आहे.

Batla House box office collection Day 16: film hit by Saaho wave? | बाटला हाऊसला हा चित्रपट देतोय टक्कर, 100 करोडच्या क्लबमध्ये एंट्री मारणार का जॉनचा हा चित्रपट?

बाटला हाऊसला हा चित्रपट देतोय टक्कर, 100 करोडच्या क्लबमध्ये एंट्री मारणार का जॉनचा हा चित्रपट?

googlenewsNext
ठळक मुद्देया विकेंडला तर प्रेक्षकांकडे साहो, मिशन मंगल आणि बाटला हाऊस असे तीन पर्याय आहेत आणि त्यामुळे आता या विकेंडला बाटला हाऊस 100 करोडच्या क्लबमध्ये पोहोचतो का हे लवकरच कळेल.

बाटला हाऊस हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पहिल्याच दिवसांपासून प्रेक्षकांचे खूपच चांगले प्रेम मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 91.76 करोड इतकी कमाई केली आहे. या चित्रपटाने 100 करोडची कमाई करण्यासाठी आता काही करोडची गरज आहे. पण काही करोड रुपयांचा गल्ला जमवणे बाटला हाऊससाठी कठीण जाणार आहे हा असा प्रश्न सगळ्यांना पडत आहे.

प्रभासचा साहो हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रभासची लोकप्रियता पाहाता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवेल असे म्हटले जात आहे. मिशन मंगल आणि बाटला हाऊस हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यामुळे मिशन मंगलने बाटला हाऊसला बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर दिली होती आणि या विकेंडला तर प्रेक्षकांकडे साहो, मिशन मंगल आणि बाटला हाऊस असे तीन पर्याय आहेत आणि त्यामुळे आता या विकेंडला बाटला हाऊस 100 करोडच्या क्लबमध्ये पोहोचतो का हे लवकरच कळेल.

बाटला हाऊस हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. १९ सप्टेंबर २००८ रोजी सकाळी ११ वाजता दक्षिण दिल्लीतील जामिया नगरातील एल-१८ बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांचे विशेष दल आणि इंडियन मुजाहिदीनचे चार अतिरेकी यांच्यात चकमक झाली होती. दोन तासांच्या धुमश्चक्रीत आतिफ अमिन आणि महम्मद साजिद ठार झाले तर विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा शहीद झाले. याच घटनेवर आधारित हा चित्रपट असून यात जॉन पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारत आहे. या चकमकीत संजय कुमार यादव यांनी पोलीस पथकाचं नेतृत्त्व केलं होतं. १९ सप्टेंबरच्या रात्री असं नेमकं काय घडलं होतं हे या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आले आहे. 

बाटला हाऊस या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणीने केले असून या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्णा कुमार मोनिशा अडवाणी, मधू भोजवानी, जॉन अब्राहम आणि संदीप लेझेल हे आहेत. या चित्रपटात जॉन प्रमाणेच मृणाल ठाकूरची मुख्य भूमिका आहे. मृणालचा हा दुसरा चित्रपट असून ती नुकती हृतिक रोशनच्या सुपर 30 या चित्रपटात झळकली होती.

Web Title: Batla House box office collection Day 16: film hit by Saaho wave?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.