Aryan Khan Drugs Case : आर्थर रोड कारागृहात शाहरुखने चाहत्यांना हात जोडून केला नमस्कार; VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 07:56 PM2021-10-21T19:56:22+5:302021-10-21T19:56:50+5:30

शाहरुखचा हा स्वभाव पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत. चाहते म्हणत आहेत, एवढ्या कठीण परिस्थितीतही शाहरुख किती आरामात चाहत्यांना अभिवादन करत आहे.

Aryan Khan Drugs Case Shahrukh Khan wins hearts as he acknowledges fans outside Arthur Road jail video viral | Aryan Khan Drugs Case : आर्थर रोड कारागृहात शाहरुखने चाहत्यांना हात जोडून केला नमस्कार; VIDEO व्हायरल

Aryan Khan Drugs Case : आर्थर रोड कारागृहात शाहरुखने चाहत्यांना हात जोडून केला नमस्कार; VIDEO व्हायरल

Next

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने (Shahrukh Khan) आज (21 ऑक्टोबर) आर्थर रोड कारागृहात जाऊन आर्यन खानची (Aryan Khan) भेट घेतली. यावेळचे अनेक व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच बरोबर, शाहरुख खानचा आणखी एक व्हिडीओही व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये शाहरुख आर्यनला भेटून कारागृहाबाहेर येत आहे, यावेळी एक चाहता त्याला हात जोडून नमस्कार करतो, यानंतर शाहरुखही त्याला हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे.

चाहते करतायत शाहरुखचं कौतुक -
शाहरुखचा हा स्वभाव पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत. चाहते म्हणत आहेत, एवढ्या कठीण परिस्थितीतही शाहरुख किती आरामात चाहत्यांना अभिवादन करत आहे. एका चाहत्याने म्हटले आहे, "शाहरुख खान कोण आहे? हे तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी केवळ काही सेकंदच पुरेसे आहेत. अशा कठीण काळातही तो आपल्या चाहत्यांना किती आदर देत आहे, वाह."

आणखी एका चाहत्याने लिहिले आहे, "या व्यक्तीत काय ग्रेस आहे. संपूर्ण सिस्टिम याला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकाने याच्यासारखे व्हायला हवे."

आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ - 
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला मुंबईच्या विशेष एनडीपीएस कोर्टाने आणखी एक धक्का दिला आहे. आर्यन खानसह अटकेत असलेल्या इतरांच्या न्यायालयीन कोठडीत आता 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आर्यन खानच्या जामीनासाठी गेल्या 16 दिवसांत 4 वेळा जामीन याचिका दाखल करण्यात आल्या. पण त्यात यश आले नाही. आज न्यायालयाने त्याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ केली.

हेही वाचा -

-  जेल अधिकाऱ्यांना शाहरुख खाननं विचारलं, मुलाला घरचं अन्न देऊ शकतो? मिळालं असं उत्तर

जेलमध्ये पाण्यासोबत खातो बिस्किट, पहिल्याच दिवशी घेतला चहा; अशी आहे आर्यन खानची कारागृहातली दिनचर्या

 

 

Web Title: Aryan Khan Drugs Case Shahrukh Khan wins hearts as he acknowledges fans outside Arthur Road jail video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app