​अर्जुन रामपालला रेल्वे स्थानकावर व्हावे लागले लाजिरवाणे, भरावा लागला दंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 06:33 AM2017-12-22T06:33:15+5:302017-12-22T12:03:15+5:30

अर्जुन रामपालला त्याची एक वाईट सवय चांगलीच महागात पडली. यासाठी त्याला केवळ दंडच भरावा लागला नाही तर सर्वांदेखत लाजिरवाणेही ...

Arjun Rampal was forced to be a railway station, shouting, imposing penalty! | ​अर्जुन रामपालला रेल्वे स्थानकावर व्हावे लागले लाजिरवाणे, भरावा लागला दंड!

​अर्जुन रामपालला रेल्वे स्थानकावर व्हावे लागले लाजिरवाणे, भरावा लागला दंड!

googlenewsNext
्जुन रामपालला त्याची एक वाईट सवय चांगलीच महागात पडली. यासाठी त्याला केवळ दंडच भरावा लागला नाही तर सर्वांदेखत लाजिरवाणेही व्हावे लागले. सध्या अर्जुन रामपाल झारखंडमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचे शूटींग करतोय. ‘नास्तिक’ असे या चित्रपटाचे नाव. झारखंडच्या पलामू रेल्वेस्थानकावर याचे शूटींग सुरु होते. एक शॉट ओके झाला आणि अर्जुनला हुक्की आली. कसली तर सिगारेटची. मग काय, रेल्वे स्थानकावर सर्वांदेखत अर्जुनने एक सिगारेट काढली आणि तो तिचे झुरके घेण्यात बिझी झाला. आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करतोय, हेही तो विसरला. पण एका दक्ष नागरिकाने अर्जुन सिगारेट पितांनाचा फोटो कॅमे-यात कैद केला आणि एसडीओकडे याची तक्रार केली. राकेश कुमार तिवारी असे या दक्ष नागरिकाचे नाव. मग काय, पलामू सर्कल अधिकाºयांनी या गुन्ह्यासाठी अर्जुनला २०० रूपयांचा दंड ठोठावला. राकेश यांच्या मते,  सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग हा गुन्हा आहे. शूटींग पाहायला हजारो लोक आले होते. याठिकाणी अभिनेताच स्मोकिंग करत असेल तर लोकांमध्ये एक चुकीचा संदेश जाईल.



‘नास्तिक’चे शूटींग गत १७ डिसेंबरपासून सुरू झाले. झारखंडच्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर या चित्रपटाचे शूटींग होणार आहे. गत गुरूवारी रांचीच्या जगन्नाथपूर ठाण्यात चित्रपटाचे काही दृश्ये शूट केली गेलीत. या चित्रपटात काही स्थानिक कलाकारांनाही संधी देण्यात येणार असल्याचे कळतेय. हा चित्रपट एका प्रामाणिक पोलिस अधिकाºयाची कथा आहे. अर्जुन रामपाल यात मुख्य भूमिकेत आहेत. बालकलाकार हर्षाली मेहता ही सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. हर्षाली यापूर्वी ‘बजरंगी भाईजान’मध्ये दिसली होती.
झारखंड सरकारने अलीकडे एक नवे चित्रपटविषयक धोरण बनवले आहे. त्यामुळे राज्यात चित्रपटांचे शूटींग वाढले आहे. त्यामुळे झारखंडमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची ये-जा सुद्धा वाढली आहे.

Web Title: Arjun Rampal was forced to be a railway station, shouting, imposing penalty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.