मलायका अरोरा आणि अर्जुनची पूलमध्ये 'मस्ती', जबरदस्त व्हिडीओ पाहून चाहत्यांना फुटला घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 11:39 AM2021-12-06T11:39:31+5:302021-12-06T11:47:49+5:30

काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुनचे ब्रेकअप झाले अशी चर्चा सुरु होती.

Arjun kapoor is enjoying happy times in the pool with malaika arora on their maldives vacation | मलायका अरोरा आणि अर्जुनची पूलमध्ये 'मस्ती', जबरदस्त व्हिडीओ पाहून चाहत्यांना फुटला घाम

मलायका अरोरा आणि अर्जुनची पूलमध्ये 'मस्ती', जबरदस्त व्हिडीओ पाहून चाहत्यांना फुटला घाम

googlenewsNext

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर स मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले होते. दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मालदीवमधली व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ स्विमिंग पूलमध्ये दोघे वर्कआऊट करताना दिसतायेत. मालयका आणि अर्जुन पाण्यात सायकलिंग करताना दिसत आहेत. पाण्यात सायकलिंग करणं कठीण असते असं म्हणतात मात्र, त्यानंतरही दोघे अगदी सहजपणे पाण्यात सायकल चालवताना दिसतायेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करतायेत. 


अलीकडेच दोघे मालदीनमध्ये क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसले. फोटोतून समजते आहे की, हे कपल एकत्र आहे आणि खूशदेखील आहे. दोघे मालदीवमधील बीचचा आनंद लुटत आहेत. मलायका आणि अर्जुनने आपले सोलो फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. हा व्हिडीओ मात्र त्याला अपवाद आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत.मलायका आणि अर्जुन भलेही त्यांच्या नात्याबद्दल फार कमी बोलताना दिसतात. मात्र दोघे सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात.


 
ब्रेकअपची होती चर्चा 
काही दिवसांपूर्वी असे वृत्त समोर आले होते की, मलायका आणि अर्जुनमध्ये सर्वकाही ठीक नाही. दोघे लवकरच वेगळे होणार आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, मलायका आणि अर्जुन दोघे ख्रिसमस आणि न्यू ईअरदेखील साजरा करणार नाहीत. मात्र आता दोघांच्या ब्रेकअपच्या वृत्तांना पूर्णविराम लागला आहे.

वर्कफ्रंट
अर्जुन कपूर नुकताच भूत पोलिस या चित्रपटात दिसला होता. लवकरच तो एक व्हिलन रिटर्न्समध्येही दिसणार आहे. मलायका अरोरा डान्स रियालिटी शो इंडिया बेस्ट डान्सर 2 ला जज करताना दिसली होती.
 

Web Title: Arjun kapoor is enjoying happy times in the pool with malaika arora on their maldives vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.