अल्पसंख्यकांसमोर गुडघे टेकवून दाखवा! दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी दिलं भारतीयांना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 11:21 AM2020-06-05T11:21:40+5:302020-06-05T11:37:49+5:30

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या ट्विटने उडाली खळबळ

anubhav sinha gives challenge to people to kneel in front of minorities says i challenge indians | अल्पसंख्यकांसमोर गुडघे टेकवून दाखवा! दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी दिलं भारतीयांना चॅलेंज

अल्पसंख्यकांसमोर गुडघे टेकवून दाखवा! दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी दिलं भारतीयांना चॅलेंज

googlenewsNext
ठळक मुद्देअनुभव सिन्हा त्यांच्या ट्विटमुळे सतत चर्चेत असतात. चित्रपटसृष्टीशी संबधित असले तरी सामाजिक मुद्यांवर ते परखडपणे मत मांडत असतात. 

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहतातच. पण त्याहीपेक्षा जास्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. त्यांनी पोस्ट केली रे केली की लगेच ती व्हायरल होते. ताजे प्रकरणही काहीसे असेच़ अनुभव सिन्हा यांनी एक ट्विट केले आणि क्षणात ते व्हायरल झाले.
अनुभव सिन्हांनी लोकांना अल्पसंख्यकांपुढे गुडघ्यावर झुकून माफी मागण्याचे आव्हान दिले. ‘मी हिंदुस्थानींनी चॅलेंज करतो, एक तारीख ठरवा आणि देशाच्या अल्पसंख्यकांसमोर एका गुडघ्यावर झुकून दाखवा. करू शकतात 2 ऑक्टोबरला? इतक्या वर्षांची माफी मागू शकता? ट्विटर आणि फेसबुकच्या बाहेर पडा,’ असे ट्विट अनुभव सिन्हा यांनी केले.

त्यांनी आणखीही एक ट्विट केले़ ‘मी सर्वांना मोजतो आहे. दलित, आदिवासी सगळे,’ असे त्यांनी या दुस-या ट्विटमध्ये लिहिले.
अनुभव सिन्हांच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर त्यांच्या या ट्विटवर कमेंट्सचा जणू पाऊस पडला. काहींनी यावरून त्यांना ट्रोलही केले.

अनुभव सिन्हा त्यांच्या ट्विटमुळे सतत चर्चेत असतात. चित्रपटसृष्टीशी संबधित असले तरी सामाजिक मुद्यांवर ते परखडपणे मत मांडत असतात. त्यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे ‘थप्पड’ हा सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला होता. अभिनेत्री तापसी पन्नू यात मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाची प्रचंड चर्चा झत्तली होती. याशिवाय अनुभव यांनी आर्टिकल 15 आणि मुल्क सारखे शानदार सिनेमेही दिग्दर्शित केले आहेत.

Web Title: anubhav sinha gives challenge to people to kneel in front of minorities says i challenge indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.