Ankita Lokhande throwback video viral says I vent my anger on Sushant Singh Rajput | अंकिता लोखंडेचा जुना व्हिडीओ व्हायरल, म्हणाली होती सुशांतवर काढते तिचा सगळा राग....

अंकिता लोखंडेचा जुना व्हिडीओ व्हायरल, म्हणाली होती सुशांतवर काढते तिचा सगळा राग....

सुशांत सिंह राजपूत केसमधील ड्रग्स प्रकरणाने सर्वांनाच धक्का दिला आहे. या केसमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दीपिका पादुकोणला एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं आहे. सोबतच श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही चौकशी होणार आहे. तीन महिने लोटले तरी अजूनही त्याच्या मृत्युच्या कारणाचा शोध लागलेला नाही. अशात सुशांतचे अनेक जुने व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच अभिनेत्री अंकिता लोखंडेचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात ती गंमतीने बोलताना दिसतेय की, ती तिचा सगळा राग सुशांतवर काढते.

अंकिता लोखंडेच्या या व्हिडीओत ती अभिनेते शेखर सुमन यांच्यासोबत बोलताना दिसतेय. यात ते तिला विचारतात की, तुला राग आल्यावर हा राग कुणावर काढतेस? यावर अंकिता उत्तर देते की, 'मी खरं सांगू...सुशांत...सर्व राग मी त्याच्यावर काढते'. या जुन्या व्हिडीओत अंकिता सुशांतसोबतच्या लग्नाबाबतही बोलताना दिसली आहे. या ती म्हणत आहे की, ते दोघे पुढील वर्षी लग्न करतील. तसेच तिने यात हेही मान्य केलं की, ती त्याच्यावर खूप प्रेम करते आणि त्याचंही तेवढंच प्रेम आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी त्याच्या बांद्र्यातील घरात मृत आढळून आला होता. ज्यानंतर त्याच्या मृत्यूचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी केली जात होती. सीबीआय आता या केसचा तपास करत आहे. पण अजूनही खरं कारण बाहेर आलेलं नाही. या केसशी संबंधित ड्रग्स प्रकरणात मात्र बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. 

हे पण वाचा :

अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत आणि क्रिती सनॉनचे जुळले होते सूत, पण...

सुशांतच्या निधनाला ३ महिने पूर्ण; अंकिता लोखंडे भावूक होऊन म्हणाली....

शिबानी दांडेकरच्या आरोपानंतर सुशांतचा भावोजी अंकिताच्या मदतीला, म्हणाला - तुझ्या हिंमतीला सलाम!

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ankita Lokhande throwback video viral says I vent my anger on Sushant Singh Rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.