सुशांत सिंग राजपूतने १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. दरम्यान सुशांतचे २०१८ साली लिहिलेले काही नोट्स समोर आले आहेत. या नोट्समध्ये त्याने बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला आहे. पण एका गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या नोट्समध्ये क्रिती सनॉनसोबत जास्त वेळ व्यतित केल्याचं म्हटलं आहे.

क्रिती आणि सुशांत यांचे पर्सनल बॉण्डिंग कुणासमोर लपून राहिले नव्हते. याच कारणामुळे सुशांतच्या निधनानंतर क्रितीने खुलून नाही पण इशाऱ्यांमधून पोस्टमध्ये त्याच्या आठवणींना उजाळा दिला होता.

'राब्ता'च्या वेळी जुळलं होतं सूत
२०१७ साली प्रदर्शित झालेला चित्रपट राब्तामध्ये सुशांत आणि क्रिती सनॉन यांनी काम केले होते. आधी या सिनेमासाठी आलिया भटला विचारण्यात आले होते. पण नंतर हा सिनेमा क्रितीच्या वाट्याला आला. २०१६ साली या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांत आणि क्रितीच्या रिलेशनशीपच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. याच वेळी सुशांतचे त्याची गर्लफ्रेंड अंकितासोबतच्या नाते संपण्याच्या वाटेवर होते. अखेर २०१६ साली सुशांत आणि अंकिताचे सहा वर्षे जुने नाते संपले. मग सुशांत क्रितीसोबत वेळ व्यतित करू लागला होता.

राब्तानंतरही क्रिती व सुशांतचे बॉण्डिंग झाले चांगले
राब्ता चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला पण क्रिती व सुशांतचे पर्सनल बॉण्डिंग खूप चांगले होत चालले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, क्रिती सुशांतला भेटण्यासाठी त्याच्या अपार्टमेंटमध्येदेखील जायची. २०१७ साली क्रितीच्या वाढदिवसादिवशी सुशांतने त्याच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. दोघे त्यांचे फ्रेंड्स व फॅमिलीसोबत मजामस्ती करताना दिसले होते. दोघे फ्रेंड्ससोबत व्हॅकेशनसाठी स्वित्झर्लंडलादेखील गेले होते.

फ्रेंडशिपशिवाय काही नाही...
सुशांत क्रितीच्या पालकांना भेटण्यासाठी तिच्या घरी देखील गेला होता. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना जोर धरला होता. पण त्या दोघांनी कधीच त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. त्यांनी नेहमीच त्यांच्यामध्ये फ्रेंडशिपशिवाय कोणतेच नाते नसल्याचे सांगितले.

क्रिती सॅननने इशाऱ्यातून व्यक्ती केली नाराजी, म्हणाली - आता हे तुझ्याबाबत राहिलेलं नाही...

निराधार वृत्त
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांतने एकदा सांगितले होते की, माझ्या व क्रितीला घेऊन सुरू असलेले वृत्त खूप इंटरेस्टिंग आहे पण निराधार आहे. आम्ही दोघे दिल्लीचे आहोत आणि खूप फूडीदेखील आहोत. ती इंजिनिअर होती आणि मी चित्रपटात येण्यापूर्वी इंजिनिअरिंगशी जोडलो गेलेलो होतो. त्यामुळे आमचे खूप जमते. क्रितीनेदेखील सोशल मीडियावर सुशांतसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे वृत्त नाकारले होते. तिने म्हटले होते की, आम्ही सहकलाकार एकमेकांचा खूप आदर करतो. या निराधार वृत्तामध्ये कोणतेच सत्य नाही. धन्यवाद.

सुशांत आणि क्रिती एकमेकांना डेट करत होते, एका अभिनेत्रीने बर्थडे पार्टीचा उल्लेख करत केला दावा

लीसा मलिकने केला दावा
अभिनेत्री लीसा मलिकने दावा केला आहे की, सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सेनन भलेही मान्य करत नसतील, पण दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघे सोबत आनंदी होते. लीसाचं सुशांतसोबत प्रोफेशनल रिलेशन होतं. ती म्हणाली की, दोघे एका बर्थडे पार्टीत फार आनंदी होते. लीसाने न्यूज एजन्सी IANS ला सांगितले की, मी सुशांतला साधारण अडीच वर्षांआधी भेटले होते. तेव्हा तो क्रितीसोबत होता. क्रितीची बर्थडे पार्टी होती. बांद्रा क्लबमध्ये सेलिब्रेशन होतं. तो नेहमीच एक चार्मिंग व्यक्ती होता जो पार्ट्यांमध्ये जाऊन लोकांच्या चेहऱ्यावर स्माइल आणत होता. आमचे अनेक कॉमन फ्रेन्ड्स होते जसा महेश शेट्टी.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After the breakup with Ankita Lokhande, Sushant and Kriti Sanon were matched, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.