ठळक मुद्दे2019 साली अल्लू अर्जुनने ही व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली होती. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर त्याचे फोटोही शेअर केले होते.

तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनला अपघात झाल्याची बातमी आली आणि चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. शनिवारी हैदराबादेत अल्लूच्या व्हॅनिटी व्हॅन फाल्कनला अपघात झाला. अल्लू अर्जुनची मेकअप टीम रामपचोदवरम येथ्ून परतत असताना हा अपघात झाला. व्हॅनिटी व्हॅनच्या ड्रायव्हरने ब्रेक मारताच मागून येणा-या लॉरीने व्हॅनला जोरदार धडक दिली. सुदैवाने यावेळी अल्लू अर्जुन व्हॅनिटीमध्ये नव्हता. त्याची मेकअप टीम  मात्र व्हॅनिटीमध्ये होती. मात्र या टीममधील सर्वजण सुरक्षित आहेत. केवळ व्हॅनिटी व्हॅनचे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक अल्लू अर्जुनच्या त्याच्या व्हॅनिटीसोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. अल्लू अर्जुन सध्या ‘पुष्पा’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. रामपचोदवरम येथे सिनेमाचे शूटींग सुरु आहे. हे शूटींग संपवून टीम हैदराबादला परतत होती.

घरी येताच मुलांना मारली मिठी

अपघातावेळी अल्लू अर्जुन व्हॅनिटीमध्ये नव्हता. मात्र या अपघाताची माहिती मिळताच त्याला धक्का बसला. घरी परतल्यावर त्याने सर्वप्रथम मुलांना कडाडून मिठी मारली. अल्लूची पत्नी स्नेहा हिने या क्षणाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला  आहे. तो घरी परतलाय, या कॅप्शनसह तिने हा फोटो शेअर केला. शिवाय अल्लू अर्जुन सुरक्षित असल्याची माहितीही दिली.
 
7 कोटींची आहे फाल्कन

2019 साली अल्लू अर्जुनने ही व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली होती. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर त्याचे फोटोही शेअर केले होते. त्याने 7 कोटी रुपयांत ही व्हॅनिटी खरेदी केली होती. फाल्कन असे त्याच्या व्हॅनिटीचे नाव आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: allu arjuns vanity van falcon meets an accident south film actor is safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.