यंदा तरी कर्तव्य नाही! -म्हणून अली फजल व रिचा चड्ढाचं लग्न लांबलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 05:43 PM2021-07-11T17:43:59+5:302021-07-11T17:46:24+5:30

रिचा चड्ढा आणि अली फजल बॉलिवूडचं एक बिनधास्त कपल. हे कपल लग्नबंधनात अडकणार, अशी गेल्या दिवसांपासून होतेय. पण आता कदाचित लग्नाचा बेत मागं पडलाय...

Ali Fazal said he needs to earn money before marrying Richa Chadha | यंदा तरी कर्तव्य नाही! -म्हणून अली फजल व रिचा चड्ढाचं लग्न लांबलं

यंदा तरी कर्तव्य नाही! -म्हणून अली फजल व रिचा चड्ढाचं लग्न लांबलं

Next
ठळक मुद्दे2013 साली प्रदर्शित झालेल्या ‘फुकरे’ या चित्रपटाच्या निमित्ताने रिचा-अलीची पहिली भेट झाली होती. तेव्हापासूनच दोघांच्या रिलेशनशिपबाबतच्या चर्चा रंगू लागली होती.

रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal ) बॉलिवूडचं एक बिनधास्त कपल. हे कपल लग्नबंधनात अडकणार, अशी गेल्या दिवसांपासून होतेय. पण आता कदाचित लग्नाचा बेत मागं पडलाय आणि कपल लिव्ह इनमध्ये राहू लागलंय.  काही महिन्यांआधी अली व रिचा लग्न करणार होते. बेत ठरला होता. पण कोरोना महामारीमुळे सगळंच वेळापत्रक कोलमडलं. अली व रिचाच्या लग्नाचा बेतही लांबणीवर पडला. लग्न लांबल्यानं या जोडप्यानं अखेर लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

तूर्तास तरी या कपलनं लग्न लांबणीवर टाकलं आहे. कारण काय तर कोरोना काळातील अनुभव. होय, आणखी काही काळ आम्ही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं अलीनं नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं. शिवाय यामागचं कारणही सांगितलं. हे कारण ऐकल्यावर चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसेल.
 रेडिओ होस्ट सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत अलीनं लग्न न करण्याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, ‘खरं आम्ही 2020 मध्ये लग्न करणार होतो. परंतु कोरोनामुळे आमच्या लग्नाची तारीख पुढं ढकलावी लागली. मात्र आता आम्ही आणखी काही काळ लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्न सर्वांसोबत सेलिब्रेट करण्याचा आमचा प्लान आहे. पण त्याआधी पैसा कमवायला हवा.  कारण कधी काय होईल सांगता येत नाही. कोरोना काळात खूप वाईट अनुभव पाहिले. काम थांबलं होतं. आजुबाजुला निराशाजनक वातावरण होतं. कुटुंबात काही दु:खद घटना घडल्या होत्या.   त्यामुळे लग्नाचा निर्णय आम्ही आणखी काही काळासाठी पुढं ढकलला.’

 अलीनं रिचाला कसं प्रपोज केलं होत? तर बिना अंगठीचं. होय, खुद्द अलीनं याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. ‘मी रिचाला प्रपोज केलं. पण यासाठी मी कहीही प्लान केला नव्हता. मी तिला प्रपोज करायला गेलो तेव्हा माझ्याजवळ अंगठीही नव्हती. फक्त हीच योग्य वेळ आणि ठिकाण आहे, एवढंच मला माहित होतं,’ असं अलीनं सांगितलं होतं.
रिपोर्टनुसार, रॉबर्ट डाऊनी (ज्युनिअर)चा ‘चॅप्लिन’ हा सिनेमा पाहत असताना रिचानं अलीला प्रपोज केलं होतं. त्यावेळी अलीनं काहीही उत्तर दिलं नव्हतं. यानंतर तीन महिन्यांनी अलीनं रिचाला प्रपोज केलं होतं.
 

Web Title: Ali Fazal said he needs to earn money before marrying Richa Chadha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app