ठळक मुद्देअलाया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे विविध अंदाजातील फोटो पोस्ट करत असते.

बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरेचा वाढदिवस दुबईत दणक्यात साजरा झाला. जंगी पार्टी रंगली. मात्र या पार्टीत एका बॉलिवूड चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा चेहरा कोणाचा तर बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवाला हिचा.
होय, ऐश्वर्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अलाया दुबईला पोहोचली. ऐश्वर्याच्या वाढदिवसांच्या पार्टीत ती सामील झाली. या पार्टीचा एक व्हिडीओ स्मिता ठाकरे यांनी शेअर केला आहे. यात ऐश्वर्य केक कापताना दिसतोय. या व्हिडीओ अलाया नाही. मात्र स्मिता यांनी हा व्हिडीओ शेअर करताना अलायाला टॅग केले आहे. ऐश्वर्य यानेही इन्स्टास्टोरीमध्ये आई स्मिता व अलायाला टॅग केले आहे.

अलायानेही शेअर केलेत फोटो
अलायानेही दुबईतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती यॉटवर पोज देताना दिसतेय. तिच्या मागे फोटोत बुर्ज अल अरब दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी अलायाच्या बर्थ डे पार्टीला ऐश्वर्यही हजर होता. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. शिवाय या फोटोची जोरदार चर्चाही रंगली होती. अलाया आणि ऐश्वर्य यांची ओळख काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी झाली होती. गेल्या दोन वर्षांत ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. अलायाच्या ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला देखील ऐश्वर्यने आवर्जून उपस्थिती लावली होती.  

 पूजा बेदीची लेक आहे अलाया
 अलाया अभिनेत्री पूजा बेदीची लेक आहे. पूजाने 1990 साली फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले. पूजाला दोन मुले आहेत अलाया आणि ओमर. पती फर्निचरवालापासून पूजाने 2003 साली घटस्फोट घेतला होता. शारीरिक छळाचे कारण तिने सांगितले होते.  अलाया फर्निचरवालाने नुकतीच बॉलिवूडमध्ये ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाद्वारे एंट्री घेतली आहे. या चित्रपटातील अलायाच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. हा चित्रपट पाहाताना  अलायाचा हा डेब्यू चित्रपट असल्याची जाणीव देखील होत नसल्याचे अनेकांनी या चित्रपटाच्या रिव्ह्यूमध्ये म्हटले होते. 

अलाया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे विविध अंदाजातील फोटो पोस्ट करत असते. ‘जवानी जानेमन’ या चित्रपटात अलायाने सैफ अली खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिचा बोल्ड अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटातील तिचा अभिनय, तिचे सौंदर्य आणि अदांनी रसिकांवर मोहिनी घातली होती. 

अलाया फर्नीचरवाला गोव्याच्या बीचवर दिसली धमाल मस्ती करताना, तिचे ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल

आलियाची कशी झाली अलाया, सैफ अली खानच्या या अभिनेत्रीची जाणून घ्या इंटरेस्टिंग स्टोरी

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: alaya furniturewala is in dubai celebrating bal thackeray grandson aaishvary thackeray birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.