Akshay Kumar's Bell Bottom casting director Ayush Tiwari faces rape charges case registered | 'बेल बॉटम' चा कास्टिंग डिरेक्टर आणि त्याच्या रूम पार्टनरवर अभिनेत्रीने लावला रेपचा आरोप

'बेल बॉटम' चा कास्टिंग डिरेक्टर आणि त्याच्या रूम पार्टनरवर अभिनेत्रीने लावला रेपचा आरोप

बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्रीने खळबळजनक खुलासा करत एका कास्टिंग डायरेक्टवर रेपसारखा गंभीर आरोप लावला आहे. त्यामुळे अक्षय कुमारचा आगामी 'बेल बॉटम' सिनेमा चर्चेत आला आहे. कारण अभिनेत्रीने याच सिनेमाचा कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर आणि त्याच्या रूममेटवर रेपचा आरोप लावत केस दाखल केली आहे. ही तक्रार वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे.

अभिनेत्रीने आयुषसोबत त्याचा रूममेट राकेश शर्मा विरोधात रेपची केस दाखल केली आहे. पोलिसांनुसार, २५ नोव्हेंबरला आयुष तिवारी विरोधा तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. पण अजून चौकशी सुरू असून आयुषला अटकही करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेपचा आरोप करणारी अभिनेत्रीने अनेक सिनेमे आणि वेबसीरीजमध्ये काम केलं आहे.

'रूम पार्टनरकडे तक्रार केल्यावर त्यानेही केला रेप'

पीडितेचा आरोप आहे की, आयुष तिवारीने लग्नाचं आमिष दाखवत तिच्यासोबत रेप केला. अभिनेत्री म्हणाली की हे सगळं असंच २ वर्षे सुरू होतं. अशात जेव्हा तिने याबाबतची तक्रार आयुषचा मित्र राकेशकडे केली तर त्याने सुद्धा तिचा रेप केला.

पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अक्षय कुमारचा सिनेमा 'बेल बॉटम' रिलीजसाठी तयार आहे. अशात ही केस समोर आल्याने हा सिनेमा पुढे जाऊन वादाचा विषय ठरू शकतो. या सिनेमात अक्षय कुमारने गुप्तहेराची भूमिका साकारली असून यात त्याच्यासोबत वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ता ही सुद्धा दिसणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Akshay Kumar's Bell Bottom casting director Ayush Tiwari faces rape charges case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.