akshay kumar wrote heart touching post on instagram photo viral with nitara | झोपडीतील वृद्ध दांम्पत्याच्या पाहुणचाराने भारावला अक्षय कुमार; वाचा, मोठ्या मनाची मोठी स्टोरी
झोपडीतील वृद्ध दांम्पत्याच्या पाहुणचाराने भारावला अक्षय कुमार; वाचा, मोठ्या मनाची मोठी स्टोरी

ठळक मुद्दे  अक्षय कुमार हा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीसाठी धावून जातो.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘हाऊसफुल 4’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली आहे. आता अक्षय एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, अक्षय चर्चेत आला तो त्याने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे. या फोटोत अक्षय व त्याची मुलगी नितारा एका झोपडीबाहेर उभे असलेले दिसत आहेत. पुढची स्टोरी मनाला भावणारी आहे.
होय, अक्षय नुकताच त्याच्या मुलीसोबत मॉर्निंग वॉकला गेला होता. यावेळी तो व नितारा तहानेने व्याकूळ झालेत. याचदरम्यान अक्षयला रस्त्याच्या कडेला असलेली एक झोपडी दिसली. या झोपडीतीन वृद्ध आजी-आजोबांना त्याने प्यायला पाणी मागितले. या आजी आजोबांनी अक्षय व निताराची तहान तर भागवली. सोबत त्यांचा गोड पाहुणचारही केला. होय, अक्षय व निताराला त्यांनी गुळ आणि भाकरी खायला दिली. या पाहुणचाराने अक्षय भारावून गेला. भावूक झाला. त्याने  ट्विटरवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्यात.

‘ आजचा मॉर्निंग वॉक माझ्या मुलीसाठी एक शिकवण देणारा ठरला. आम्ही एका गरिब दांम्पत्याकडे प्यायला पाणी मागितले. त्यांनी पाणी तर दिलेच सोबत अतिशय प्रेमाने गुळ-भाकरी खाऊ घातली. खरच दयाळू असल्याचे कारण काहीही नाही. पण याचा अर्थ सगळे काही आहे,’ असे अक्षयने लिहिले.
  अक्षय कुमार हा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीसाठी धावून जातो. कोल्हापूरमध्ये आलेला महापूर असो की बिहारमधला पूर, शेतक-यांच्या आत्महत्या असो किंवा जवानांना मदत अशा प्रत्येक वेळी त्याने भरघोस आर्थिक मदत केलीय.

Web Title: akshay kumar wrote heart touching post on instagram photo viral with nitara

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.