ठळक मुद्देअक्षयच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. मिशन मंगल या चित्रपटाला महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आले आहे. 

मिशन मंगल हा सिनेमा भारताच्या मंगळ मोहिमेची विजयगाथा सांगणारा चित्रपट आहे. अक्षयने यात राकेश धवनची व्यक्तिरेखा साकारली आहे. आता अक्षयच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. या चित्रपटाला महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आले आहे. 

मिशन मंगल या चित्रपटाचा विषय पाहाता या चित्रपटाला महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आले आहे. ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून याबद्दल सांगितले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, मिशन मंगल हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे.  

मिशन मंगलने पहिल्याच दिवशी 29.16 कोटींची कमाई करत नवा विक्रम रचला होता तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 17.28 कोटींची कमाई केली होती. यापूर्वी अक्षयचा ‘गोल्ड’ हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानेदेखील पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 25.25 कोटींची कमाई केली होती. परंतु, ‘मिशन मंगल’ ने या चित्रपटालाही मागे टाकले. गेल्या काही वर्षांत अक्षयने सामाजिक आणि देशभक्तीपर चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचे हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. ‘मिशन मंगल’ हा त्यापैकीच एक चित्रपट आहे.

24 सप्टेंबर 2014 मध्ये भारताच्या शास्त्रज्ञांनी मंगळावर ‘मंगळयान 1’ पाठविले होते. मंगळयान बनवणे हे भारतापुढील मोठे आव्हान होते. कारण हे यान घडवण्यासाठी लागणारा खर्च हा भारताला परवडण्यासारखा नव्हता. परंतु राकेश धवन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आव्हान पेलत अतिशय कमी खर्चात ही मोहीम फत्ते केली होती. पहिल्याच प्रयत्नात आणि अतिशय कमी खर्चात ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. हीच कथा ‘मिशन मंगल’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

मिशन मंगल या चित्रपटाची निर्मिती आर बाल्की यांनी केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, क्रीती कुल्हारी, शर्मन जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 


Web Title: Akshay Kumar starrer 'Mission Mangal' declared tax-free in Maharashtra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.