akshay kumar memes goes viral on social media after pv sindhu biopic announced | Memes Viral: मजे ले रहा है तू!! नेटक-यांनी का घेतली अक्षय कुमारची मजा?
Memes Viral: मजे ले रहा है तू!! नेटक-यांनी का घेतली अक्षय कुमारची मजा?

अक्षय कुमारसोबत ‘मिशन मंगल’ हा चित्रपट केल्यानंतर तापसी पन्नूच्या झोळीत आणखी एक चित्रपट पडला आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘रश्मी रॉकेट’. काही तासांपूर्वी या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले. अक्षय कुमारने हे पोस्टर शेअर केले. ‘हे रॉकेट आपल्या नव्या मिशनसाठी तयार आहे,’ असे हे पोस्टर त्याने शेअर केले. 

अक्षयच्या या ट्वीटला तापसीने लगेच उत्तर दिले. ‘फोर्ब्सच्या बाबतीत मला माहित नाही. पण ही शर्यत मी नक्कीच जिंकू शकते,’ असे तिने अक्षयला उद्देशून लिहिले. तिचे ते उत्तर वाचून अक्षयने ‘मजे ले रही है तू,’ असे लिहिलेले एक मीम शेअर केले. 
अक्षयने हे मीम शेअर करताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. हे मीम्स पाहून हसून हसून पोट दुखेल इतके ते भन्नाट आहेत. एका युजरने अक्षयचा एपीजे अब्दुल कलाम यांच्या लूकमधील फोटो शेअर करत, ‘आता अक्षय कुमार एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकमध्ये काम करणार,’ असे लिहिले. अनेकांनी पीव्ही सिंधूच्या चेह-यावर अक्षयचा चेहरा फोटोशॉप्ड करून अक्षयची मजा घेतली.
हे मीम्स पाहाच आणि मनसोक्त हसा...
 

  


Web Title: akshay kumar memes goes viral on social media after pv sindhu biopic announced
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.