Akshay Kumar: I drink cow urine every day , live chat with bear gryll | फिटनेससाठी अक्षय कुमार दररोज पितो गोमूत्र; बेअर ग्रिल्ससोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये केला खुलासा

फिटनेससाठी अक्षय कुमार दररोज पितो गोमूत्र; बेअर ग्रिल्ससोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये केला खुलासा

ठळक मुद्देक्षय कुमार भाग घेणार असलेला हा शो आज 11 सप्टेंबरला डिस्कव्हरी प्लसवर प्रसारित होणार आहे. यानंतर 14 सप्टेंबरला डिस्कव्हरी चॅनलवर हा शो प्रसारित होणार आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या फिटनेसचे लाखो-करोडो ‘दिवाने’ आहेत. वयाच्या 53 व्या वर्षीही अक्षय कमालीचा फिट आहे. लवकर झोपणे, पहाटे लवकर उठणे, नियमित व्यायाम, डाएटवर नियंत्रण हे अक्षयच्या फिटनेसचे रहस्य आहे. याशिवाय अक्षयच्या फिटनेससाठी आणखी एक गोष्ट न चुकता करतो. एका लाईव्ह चॅटदरम्यान खुद्द त्याने हा खुलासा केला. होय, फिटनेसाठी अक्षय दररोज न चुकता गो-मूत्राचे प्राशन करतो.
पीएम नरेंद्र मोदी, सुपरस्टार रजनीकांत यांच्यानंतर अक्षय लवकरच बेअर ग्रिल्ससोबत ‘इन टू द वाइल्ड’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकणार आहे. या शोचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला होता. या शोच्या प्रीमिअरपूर्वी अक्षयने बेअर ग्रिल्ससोबत एका लाईव्ह चॅटमध्ये गप्पा मारल्या. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिनेही या लाईव्ह चॅटमध्ये भाग घेतला. यावेळी हुमाने अक्षयला हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेल्या चहाबद्दल विचारले.

‘इन टू द वाइल्ड’ या शोच्या प्रोमोमध्ये अक्षय हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेल्या चहाचा आस्वाद घेताना दिसतोय. हुमाने अक्षयला नेमक्या या चहाबद्दल विचारले. तू हे कसे करू शकला, हत्तीच्या विष्ठेपासून चहा तू कसा प्यायला? असे हुमाने विचारले. यावर माझ्यासाठी हे फार काही कठीण नव्हते, असे अक्षय म्हणाला.
आयुर्वेदिक कारणांसाठी मी रोज गोमूत्राचे प्राशन करतो. त्यामुळे हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेल्या चहाचा आस्वाद घेणे माझ्यासाठी फार काही कठीण काम नव्हते, असे त्याने सांगितले.

बेअरने केली प्रशंसा
अक्षयने अगदी सहज हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेला चहा प्यायला. माझ्या शोमध्ये येणारे अनेकजण असे करू शकत नाही. लोक फेमस होतात, तेव्हा ते त्यांच्या कम्फर्ट झोनबाहेर येऊन काम करणे थांबतात. कारण आपण जगापुढे कमजोर दिसू, अशी भीती त्यांना असते. पण अक्षय प्रत्येक गोष्टीसाठी तयार होता, अशा शब्दांत बेअर ग्रिल्सने अक्षयची प्रशंसा केली.

मूंछे कडक लग रही है अक्की...
अभिनेता रणवीर सिंगनेही या लाईव्ह चॅटमध्ये भाग घेतला. त्याने अक्षयच्या मिशीची तारीफ केली. ‘मूंछे कडक लग रही है अक्की’, असे तो म्हणाला. अक्षयने त्याच्या ‘बेलबॉटम’ या आगामी सिनेमासाठी हा नवीन लूक धारण केला आहे.

...म्हणून बेअर ग्रिल्सला माझे हिंदीतील संभाषण समजले; मोदींनी केला खुलासा

मरता मरता वाचला होता अक्षय कुमार, जीवावर बेतला असता ‘तो’ स्टंट

बेअर ग्रिल्सच्या शोमध्ये गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतदेखील यात दिसले होते. आता खिलाडीकुमारदेखील या शोमध्ये हजेरी लावणार आहे. अक्षय कुमार भाग घेणार असलेला हा शो आज 11 सप्टेंबरला डिस्कव्हरी प्लसवर प्रसारित होणार आहे. यानंतर 14 सप्टेंबरला डिस्कव्हरी चॅनलवर हा शो प्रसारित होणार आहे. म्हैसूरच्या बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये याचे शूटींग झाले आहे.


 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Akshay Kumar: I drink cow urine every day , live chat with bear gryll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.