ठळक मुद्दे‘केसरी’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान अक्षयला दुखापत झाली होती. मात्र अशाही स्थितीत त्याने शूटींग पूर्ण केले होते.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला आणखी एका नावाने ओळखले जाते. ते म्हणजे, ‘गॅरंटी कुमार’. अक्षयचा सिनेमा म्हणजे, यशाची गॅरंटी. म्हणून अक्षयला ‘गॅरंटी कुमार’ म्हणून ओळखले जाते. याच ‘गॅरंटी कुमार’चा आज वाढदिवस. आज अक्षय त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करतोय. 

त्याचे खरे नाव राजीव हरिओम भाटिया आहे. मात्र आज त्याला अक्षय कुमार याच नावाने ओळखतात. अक्षय त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो. चित्रपटातील स्टंट तो स्वत: करतो. मात्र हे स्टंट करताना अक्षय अनेकदा जखमी झाला आहे. अगदी मरता मरता वाचला आहे.

‘खिलाडीयों का खिलाडी’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान अक्षयचे मान तुटता तुटता बचावली. 1996 साली रिलीज झालेल्या या सिनेमात रेखा, रवीना टंडन, गुलशन ग्रोव्हर आणि डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार अंडरटेकरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. यात अक्षय व अंडरटेकरचा एक फाईट सीक्वेन्स होता. यात अक्षय अंडरटेकरला उचलून फेकतो, असा सीन होता. 

सीन देताना अक्षयने अगडबंब अंडरटेकरला उचलले आणि त्याच्या मानेवर नको इतके वजन पडले. यामुळे अक्षयची मान आखडली होती. या स्टंटवेळी अक्षयची मान थोडक्यात बचावली होती. 

हा सिनेमा मात्र जबरदस्त हिट ठरला होता आणि यातील त्याचे सीन्सही लोकांना प्रचंड आवडले होते. 6 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने त्यावेळी 25 कोटींचा बिझनेस केला होता.

‘केसरी’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान अक्षयला गंभीर दुखापत झाली होती. मात्र अशाही स्थितीत त्याने शूटींग पूर्ण केले होते. ‘सूर्यवंशी’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यानही त्याच्या हाताला इजा झाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Birthday Special: when akshay kumar face stunt accident while khiladiyon ka khiladi shooting with undertaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.