फसलात ना? ही अभिनेत्री नाही तर आहे बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:57 PM2019-10-03T12:57:44+5:302019-10-03T12:58:53+5:30

फोटोतील व्यक्ती अभिनेत्री नाही तर अभिनेता आहे. वाचून आश्चर्य वाटले ना.

akshay kumar film laxmmi bomb new poster |  फसलात ना? ही अभिनेत्री नाही तर आहे बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता 

 फसलात ना? ही अभिनेत्री नाही तर आहे बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता 

googlenewsNext
ठळक मुद्दे या सिनेमात अक्षय एका ट्रान्सजेंडर भूताची भूमिका साकारणार आहे.  

फोटोतील ही व्यक्ती अभिनेत्री नाही तर अभिनेता आहे. वाचून आश्चर्य वाटले ना. पण होय, फोटोतील या अभिनेत्याचे नाव आहे, अक्षय कुमार. अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या आगामी चित्रपटाचे हे पोस्टर आहे. अक्षयने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले.
या पोस्टरमध्ये अक्षयने लाल रंगाची साडी नेसलेली आहे.  माथ्यावर लालभडक कुंकू, गळ्यात तावीज असा त्याचा अवतार आहे. त्याच्या मागे देवीची भव्य मूर्ती आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ चे पोस्टर शेअर करताना अक्षयने नवरात्रीचा अर्थही सांगितला आहे. ‘नवरात्रीचा अर्थ होतो, स्वत:मधील दैवी शक्तीसमोर नतमस्तक होणे आणि या अमर्याद शक्तीचे गुणगान करणे. नवरात्रीच्या पावन मुहूर्तावर मी ‘लक्ष्मी’ या व्यक्तिरेखेचे लूक शेअर करतोय. एक अशी व्यक्तिरेखा जी साकारताना मी एक्साइटेड आहे आहे, तेवढाच नर्व्हस,’ असे अक्षयने हे पोस्टर शेअर करताना लिहिले आहे.




लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट तमिळ सिनेमातील ‘कंचना 2’  चित्रपटाचा रिमेक आहे. तसेच अक्षय कुमार सोबत कियारा अडवाणीसुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. जून 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  मे 2019 मध्ये अक्षय कुमारने ‘लक्ष्मी बॉम्ब’ सिनेमाची पहिली झलक शेअर केली होती. तेव्हापासूनच अक्षयच्या सिनेमातील लूकची सर्वत्र चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.




अक्षय कुमार आपल्या अभिनयाच्या माध्यमातून  फॅन्सना नेहमीच काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो.  या सिनेमात अक्षय एका ट्रान्सजेंडर भूताची भूमिका साकारणार आहे.  अक्षय कुमारला ब-याच दिवसांपासून ‘कंचना 2’ची स्क्रिप्ट आवडली होती आणि त्यामुळे या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यासाठी त्याने होकार दिला होता. अर्थात गेल्या वर्षभर अतिशय बिझी असल्यामुळे अक्षयचा हा रिमेक थंडबस्त्यात पडला. पण आता रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हातावेगळा करताच अक्षय या रिमेकचे काम सुरु करणार आहे. 

Web Title: akshay kumar film laxmmi bomb new poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.