akshay kumar film housefull 4 has a baahubali connection | ‘हाऊसफुल 4’मध्ये प्रेक्षकांसाठी आहे मोठ्ठे सरप्राईज, जाणून घ्या काय?
‘हाऊसफुल 4’मध्ये प्रेक्षकांसाठी आहे मोठ्ठे सरप्राईज, जाणून घ्या काय?

अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ने अलीकडे १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. आता अक्षय आपल्या आगामी चित्रपटात गुंतला आहे. हा चित्रपट म्हणजे, ‘हाऊसफुल 4’. तूर्तास राजस्थानात या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे़. या चित्रपटाबद्दलची एक खास इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे.
होय, सूत्रांचे मानाल तर या चित्रपटात अक्षय कुमार चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज घेऊन येणार आहे. होय, या चित्रपटात अक्षय डबलरोलमध्ये दिसेल. यापैकी एक रोल वर्तमानातला असेल आणि दुसरा ‘बाहुबली’ काळातील.  ‘बाहुबली’ चित्रपटात ज्याप्रमाणे पुनर्जन्माची कथा दाखवली गेली होती, अक्षयची पात्राची कथाही काहीशी अशीच असेल. म्हणजे, हा चित्रपट पुनर्जन्मावर आधारित असेल.
‘हाऊसफुल 4’चे पहिले शेड्यूल पूर्ण झाले आहे, तूर्तास सूर्यगड पॅलेसमध्ये दुसऱ्या शेड्यूलचे शूटींग सुरू आहे. साजिद खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. साजिद दीर्घकाळापासून ‘हाऊसफुल’ फ्रेन्चाईजीशी जुळलेला आहे. अर्थात साजिद आणि साजिद नाडियाडवाला यांच्यात मतभेद झाल्याने ‘हाऊसफुल3’मध्ये साजिदचा कुठलाही सहभाग नव्हता. पण हे मतभेद आता मिटले आहेत आणि साजिद परतला आहे. हा चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. हाउसफुल- 3’ 2016 मध्ये रिलीज झाली होता. या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला होता. त्यामुळे चौथा भागही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल, असा निर्मात्यांना ठाम विश्वास आहे. आतापर्यंत या सिरीजचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून, सर्वच सुपरहिट ठरले आहेत. आता चौथा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

English summary :
The first schedule of 'Housefull 4' has been completed, The second schedule is already on the way at Suryagad Palace. The film is Directed by Sajid Khan


Web Title: akshay kumar film housefull 4 has a baahubali connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.