Aishwarya Rai Bachchan केवळ एका व्यक्तीला इन्स्टावर फॉलो करते, तुम्ही ओळखू शकता का नाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 06:21 PM2021-07-17T18:21:04+5:302021-07-17T18:21:15+5:30

तुम्हाला माहीत आहे का की, ऐश्वर्या राय इन्स्टाग्रामवर (Aishwariya Rai Bachchan Instagram) केवळ एका व्यक्तीला फॉलो करते. 

Aishwarya Rai Bachchan follows only one celebrity on Instagram can you guess the name? | Aishwarya Rai Bachchan केवळ एका व्यक्तीला इन्स्टावर फॉलो करते, तुम्ही ओळखू शकता का नाव?

Aishwarya Rai Bachchan केवळ एका व्यक्तीला इन्स्टावर फॉलो करते, तुम्ही ओळखू शकता का नाव?

Next

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. आता भलेही ती कमी सिनेमे करते पण तिची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. २०१८ मध्ये आलेला 'फन्ने खां' हा तिचा अखेरचा सिनेमा होता. तेव्हापासून सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स वाढतच आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, ऐश्वर्या राय इन्स्टाग्रामवर (Aishwariya Rai Bachchan Instagram) केवळ एका व्यक्तीला फॉलो करते. 

जर तुम्ही ऐश्वर्याला इन्स्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की, ऐश्वर्या जास्तीत जास्त फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करणे पसंत करते. या फोटोंमध्ये ती फॅमिलीसोबत जास्त वेळ घालवताना दिसते. तिच्या फोटोंमध्ये पती अभिषेक बच्चन, मुलगी आराध्या, सासरे अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि तिची आई जास्त दिसतात. 

किती आहेत फॉलोअर्स?

ऐश्वर्या रायचं इन्स्टाग्राम अकाऊंट हे विना जाहिराती केवळ तिच्याच फोटोंनी भरलेलं आहे. इन्स्टाग्रामवर तिचे सध्या ९.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचे देश-विदेशात लाखो-करोडो चाहते आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन इन्स्टावर कुणाला फॉलो करते?

या व्यक्तीला फॉलो करते ऐश

आश्चर्याची बाब म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन केवळ एक इन्स्टाग्राम अकाऊंट फॉलो करते. त्यात ना अमिताभ बच्चन आहेत, ना अजून कुणी. ऐश्वर्या ज्या एका व्यक्तीला इन्स्टाग्रामवर फॉलो करते ती व्यक्ती आहे तिचा पती अभिषेक बच्चन. 

अभिषेक सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा

YouTuber रणवीरसोबत एका पॉडकास्टमध्ये अभिषेकने त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. ते पहिल्यांदा स्वित्झर्लॅंडमध्ये भेटले होते. तो म्हणाला की, 'मी तिला पहिल्यांदा तेव्हा भेटलो जेव्हा  मी एक प्रॉडक्शन बॉय होतो. माझे वडील मृत्यूदाता नावाचा सिनेमा करत होते. आणि मी लोकेशन रेकीसाठी स्वित्झर्लॅंडला गेलो होते. कंपनीला वाटलं की, मी मोठा झालो. स्वित्झर्लॅंडमध्ये मी शिकलो. तर त्यांना वाटलं मी चांगले लोकेशन दाखवू शकेन. मी तिथे काही दिवसांसाठी एकटा होतो. तेव्हाच माझा बालपणीचा मित्र बॉबी देओल तिथे 'और प्यार हो गया' चं शूटींग करत होता. त्याला समजलं की, मी तिथे आहे. त्याने मला रात्री जेवायला बोलवलं. तेव्हा मी ऐश्वर्याला पहिल्यांदा भेटलो. तेव्हा ती शूटींग करत होती'.
 

Web Title: Aishwarya Rai Bachchan follows only one celebrity on Instagram can you guess the name?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app