रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या प्रेमकथेची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. ही जोडी त्यांच्या चाहत्यांची फेव्हरिट होती. सहा वर्षांच्या रिलेशनशीपनंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफने ब्रेकअप केले होते. त्यांच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्या दोघांनी कधीच आपल्या ब्रेकअपचे कारण मीडियात सांगितलेले नाही. आता ते पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. 


कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांनी नुकतेच एका जाहिरातीमध्ये सोबत काम केले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. मात्र, कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या चाहत्यांना त्यांना एकत्र पाहून खूप आनंद झाला आहे. 


कतरिना आणि रणबीर यांच्या ब्रेकअपला जवळपास दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी एका मोबाईल कंपनीची जाहिरात नुकताच शूट केली आहे. या शूटवेळी त्यांनी बरीच धमाल देखील केली हे व्हिडीओत पहायला मिळते आहे. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही जाहिरात लवकरच पहायला मिळणार आहे. 


रणबीर कपूर सध्या आलिया भटसोबत नात्यात असून ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावताना दिसतात. पण, त्यांनी नात्याबद्दल खुलासा केला नाही. नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनसाठी रणबीर आणि आलिया त्यांच्या फॅमिलीसोबत रणथंबौर येथे गेले होते. 


तर कतरिना कैफ अभिनेता विकी कौशलला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. न्यू ईअरच्या पहिल्या दिवशी कतरिनाशिवाय तिची बहीण इसाबेलनेही अलिबाग व्हॅकेशनचे फोटो शेअर केलेत. विकीनेसुद्धा भाऊ सनीसोबतचे फोटो पोस्ट केलेत. या फोटोतील स्विमिंग पूल आणि सेम बॅकग्राऊंड पाहून विकी, कॅट, इसाबेल आणि सनी हे चौघे अलिबागला एकत्र होते, याचा आणखी एक पुरावा मिळाला. ‘कॉफी विद करण’या शोमध्ये विकीने कतरिनाला डेट करत असल्याच्या बातम्या नाकारल्या होत्या. कतरिना मला आवडते. पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे तो म्हणाला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After many years of breakup, Ranbir Kapoor and Katrina Kaif came together again, find out about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.