​दत्तक मुले झाली प्रसिद्ध सेलिब्रिटी !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 12:59 PM2017-11-24T12:59:19+5:302017-11-24T18:29:19+5:30

अनेक जोडपी, मुले होत नसल्यामुळे हताश न होता दत्तक मुले घेतात. या मुलांचे संगोपन नीट व्हावे यासाठी हे पालक ...

Adopted Children's Famous Celebrities! | ​दत्तक मुले झाली प्रसिद्ध सेलिब्रिटी !

​दत्तक मुले झाली प्रसिद्ध सेलिब्रिटी !

googlenewsNext
ेक जोडपी, मुले होत नसल्यामुळे हताश न होता दत्तक मुले घेतात. या मुलांचे संगोपन नीट व्हावे यासाठी हे पालक खूप काळजी घेतात. ही मुले मोठी होऊन कर्तृत्ववान व्हावीत यासाठी ते प्रयत्नशील असतात. दत्तक घेतलेली असंख्य मुले सेलिब्रेटी झाली आहेत. आपली वेगळी छाप सोडलेल्या काही दत्तक सेलिब्रेटीजची ही गोष्ट.

Image result for rajesh khanna

*राजेश खन्ना
राजेश खन्ना यांचे मुळ नाव जतीन खन्ना. जतीनचे आई वडील भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर भारतात आले आणि अमृतसरमध्ये राहू लागले. जतीनला त्याचे चुलते चुन्नीलाल खन्ना आणि लीलावती यांनी दत्तक घेतले. सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्या आधी त्यांना राजेश खन्ना या नावाने लोक ओळखत. हेच नाव त्यांनी कायम ठेवले. १९६९ ते १९७२ या काळात त्यांनी लागोपाठ १५ सुपरहिट सिनेमे दिले. ते बॉलिवूडचे पहिले सुपस्टार म्हणून ओळखले जातात.

Related image

*अर्पिता खान
सलमानची लहान बहिण अर्पिता बॉलिवूड सर्कलमध्ये सर्व परिचीत आहे. अर्पिता ही दत्तक मुलगी आहे. तिची सुटका मुंबईच्या फुटपाथवरुन सलीम खान यांनी केली होती. नंतर याच मुलीला त्यांनी दत्तक घेतले. रडणाऱ्या या छोट्या मुलीला तुझे नाव काय असे विचारले असता रडत तिने अर्पिता हे नाव सांगितले होते. अशा तऱ्हेने ती प्रसिध्द 'खानदाना'ची सदस्य झाली.

Related image

*डिंपल कपाडिया
हिंदी सिनेसृष्टीत राज कपूर आणि नर्गिस यांची रोमँटिक केमेस्ट्री अफलातून होती. डिंपल कपाडिया ही या जोडीचे अपत्य मानले जाते. नर्गिसने जेव्हा सुनिल दत्त यांच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला तेव्हा डिंपल हिला कपाडिया फॅमिलकडे सुपूर्त करण्यात आले.  'बॉबी' चित्रपटातून डिंपलला लाँच करण्यात आले. तेव्हा ही नर्गिस सारखी वाटते अशी चर्चा सुरू झाली.ऋषी कपूर डिंपलकडे आकर्षित होतोय लक्षात आल्यानंतर राजकपूरने त्याला रोखले होते. ही तुझी बहिण असल्याचे समजवले होते.

Related image

*मार्लिन मॅन्रो 
हॉलिवूड चित्रपटांची ‘प्रणय प्रतीक’ बनलेली अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल व गायिका मार्लिन मॅन्रो ही दत्तक मुलगी आहे हे ऐकल्यावर अनेकांना आश्चर्य वाटू शकते. एका गरीब अविवाहित महिलेल्या पोटी तिचा जन्म झाला. या मुलीला वाढवणे तिच्या आईला कठिण होते. तिचे बालपण सुधारगृहात आणि अनाथलयात गेले. तिचा जगण्यासाठीचा संघर्ष खूप मोठा होता. अखेर तिच्या आईच्या मित्राने तिला दत्तक घेतले.

Related image

*स्टीव्ह जॉब्स
जगाचा ख्यातनाम टेक गुरू आणि अ‍ॅपल इंडस्ट्रीजचा संस्थापक स्टीव्ह जॉब्स हे दत्तक व्यक्ती आहेत. त्यांचे दिवंगत वडील अब्दुलफत्ताह जंदाली हे सिरियन मुस्लीम होते आणि आई जोन्नी शिबल या ख्रिश्चन होत्या. त्यांचे आंतर्धर्मिय संबंध स्वीकारले गेले नाहीत. म्हणून त्यांनी मुलगा स्टीव्ह याला पॉल आणि क्लारा जॉब्स यांना दत्तक देण्यात आले.

Web Title: Adopted Children's Famous Celebrities!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.