सुशांत सिंंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आले आहे. ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्तीला अटक केली असून त्यांनी तपासाचा वेगही वाढवला आहे. यादरम्यान सुशांतच्या फार्महाउसचीही झडती घेतली. जिथे बऱ्याच गोष्टींचा खुलासा झाला. 

आजतकने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सुशांतच्या फार्महाउस मॅनेजरने एक मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, सुशांतच्या फार्महाउस पार्टीला अभिनेत्री सारा अली खान येत होती. तिच्यानंतर रिया चक्रवर्ती येऊ लागली.  

पार्टीमध्ये मागवले जायचे स्मोकिंग पेपर
मॅनेजर रईसने सांगितले की, सुशांतच्या फार्महाउसमध्ये पार्ट्या व्हायच्या जिथे बॉलिवूडची कलाकार यायचे. मॅनेजरने सारा अली खानचेदेखील नाव घेतले. सारानंतर रिया चक्रवर्ती फार्महाउसवर यायची. त्याने हेदेखील सांगितले की, सुशांतला कधी ड्रग्स घेताना पाहिले नाही. मात्र त्यांच्या पार्टीमध्ये स्मोकिंग पेपर मागवले जात होते. ते का मागवले जात होते हे माहित नाही. 

फार्महाउसवर आले होते रियाचे आई-वडील
मॅनेजर पुढे म्हणाला की, एप्रिलमध्ये रियाचे येणेजाणे सुरू झाले होते. ३१ एप्रिलला फार्म हाउसमध्ये बर्थडे पार्टी सेलिब्रेट केली होती त्यावेळी रियाचे आई वडील आले होते.

सुशांत सिंग राजपूतच्या फॉर्म हाऊसवर व्हायची ड्रग्स पार्टी?, NCBने तपासाची चक्र फिरवली
 

युरोप ट्रीपनंतर सुशांतची तब्येत नव्हती ठीक
मॅनेजरने सुशांतबद्दल बरेच काही सांगितले. तो म्हणाला की, जेव्हा सुशांत युरोप ट्रिपवरून परतला तेव्हा त्याची तब्येत ठीक नव्हती. तो आयलंडलादेखील जात होता. बोटिंग करत होता पण एवढंच माहित होते की त्यांची तब्येत ठीक नाही आहे. यापूर्वी सुशांतच्या फार्महाउस मॅनेजरने सांगितले की आत्महत्येच्या एक दिवसापूर्वी सुशांतने फार्महाउसमधील तीन पाळलेल्या कुत्र्यांच्या नावाने निधी पाठवला होता.

पर्दाफाश..! सुशांतच्या या ४ व्हिडीओतून रियाच्या खोटारडेपणा झाला उघड?
 

रिया-साराशिवाय या अभिनेत्रींचीदेखील नावं आली समोर
सुशांत आत्महत्या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. चौकशीत रियाने एनसीबीला बॉलिवूड सेलिब्रेटींची नावे सांगितले होते. यात सारा अली खान, रकुल प्रीत आणि सिमोन खम्बाटाचे नावाचादेखील समावेश आहे. पवना डॅमवर बनलेल्या आपती गवंडे नामक ज्या आयलंडवर सुशांत जात होता तिथे एनसीबीची नजर आहे. एनसीबीने ज्या व्यक्तीचे स्टेटमेंट घेतले त्याच्यानुसार आयलंडवर सुशांतसोबत रिया चक्रवर्ती बऱ्याच वेळा आली आहे. सुशांतसोबत सारा अली खान ४ ते ५ वेळा आली आहे, सुशांतसोबत श्रद्धा कपूरही आली आहे.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The actress used to come to Sushant's farmhouse party without Riya Chakraborty; Revealed in sting operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.