बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या फार्म हाउसबद्दल कित्येक चर्चा ऐकायला मिळत आहे. सुशांतच्या फार्म हाउसमधील चार व्हिडिओ नुकतेच समोर आले आहेत. जे दर्शवत आहेत की सुशांत खूश होता आणि त्याची तब्येत देखील उत्तम होती. त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होतोय की अचानक असे काय झाले की सुशांतची मानसिक स्थिती ढासळली. हे व्हिडिओ सांगत आहेत की सुशांतची तब्येत आणि मानसिक स्थितीचं कारण देऊन भरकटवले जात असल्याचा दावा झी न्यूजने त्यांच्या रिपोर्टमध्ये केला आहे.


झी न्यूजच्या रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंग राजपूतचे फार्म हाउस हँगआउट व्हिलामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. सुशांतचा फ्लॅटमेट सॅम्युअलने इंस्टाग्राम अकाउंटवर या फार्महाउसवरील आणि सुशांतचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. आतापर्यंत सुशांतच्या फार्महाउसच्या बाहेरील फोटो आपण पाहिले आहेत. 
सुशांतचे हे व्हिडिओ साक्ष देत आहेत की सुशांत खूश होता आणि त्याची तब्येत व मानसिक स्थितीदेखील ठीक होती.

निशाणेबाज सुशांत
या व्हिडिओत सुशांत आपल्या फार्महाउसवर निशाणेबाजी करताना दिसतो आहे आणि एकाच निशाण्यात त्याने समोरील बाटली पाडली. अचूक निशाणा लागल्यानंतर सुशांतच्या चेहऱ्यावरील आनंद तुम्ही पाहू शकता.

गिटार वाजवताना सुशांत
या व्हिडिओत सुशांत त्याच्या फार्महाउसमधील बाल्कनीत आपल्या काही फ्रेंड्ससोबत बसला आहे आणि गिटार वाजवतो आहे. मागून गाण्याचा आवाज कानावर पडतो आहे. हे गाणे आहे लग जा गले के फिर ये हसीं रात हो ना हो... संध्याकाळ ढळत असताना सुशांत हे गाणं एन्जॉय करताना दिसतो आहे.

शिवभक्त सुशांत
आपल्या सगळ्यांना माहित आहे की सुशांत शिव भक्त होता. या तिसऱ्या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला काही मंत्रोच्चार ऐकू येत आहेत आणि सोबत सुंदर नजारादेखील पहायला मिळतो आहे.

टेबल टेनिस खेळताना सुशांत
चौथ्या व्हिडिओमध्ये सुशांत संपूर्ण एनर्जीसोबत टेबल टेनिस खेळताना दिसतो आहे. त्याचा हा उत्साह पाहून कोण म्हणेल की हा डिप्रेशनला बळी पडला होता. 
हे व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की सुशांत अचूक निशाणा लावतो आहे, एनर्जीने टेबल टेनिस खेळतोय, गिटार वाजवतोय म्हणजे तो मानसिक आणि शारिरीकरित्या फिट होता.

बघा सुशांतचे ५ बेस्ट Unseen Video, जे त्याची बहीण श्वेताने शेअर केले!

२.५ लाख रुपये फार्महाउसचं भाडं
असे सांगितले जात आहे की सुशांतने हे फार्म हाउस भाड्याने घेतले होते. ज्याच्यासाठी सुशांत दर महिन्याला जवळपास अडीच लाख रुपये भाडे देत होता. एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या फार्महाउसवर सुशांतसोबत रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठानी यांच्यासोबत त्यांचे मित्र पार्टी करत होते. या व्यतिरिक्त बॉलिवूडचे कित्येक सेलिब्रेटी या फार्महाउसवर पार्टी करत होते. त्यामुळे एनसीबी सुशांतच्या फार्महाउसच्या माध्यमातून ड्रग्समध्ये कुण्या मोठ्या व्यक्तीचा हात होता का, हे शोधत आहेत.

बॉलिवूडचे अनेक टॉप अ‍ॅक्टर्स ड्रग्ज अ‍ॅडिक्ट, ड्रग्जमुळेच मिळते काम...! सुशांतचा मित्र युवराजचे धक्कादायक खुलासे


सुशांत सिंग राजपूतचे हे चार व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे चाहते विचारत आहेत की रियाला भेटल्यानंतर काही कालावधीत सर्व काही कसे बदलून गेले. अचानक सुशांत आजारी का पडला?

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Exposed ..! From these 4 videos of Sushant, Riya's hypocrisy was exposed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.