बघा सुशांतचे ५ बेस्ट Unseen Video, जे त्याची बहीण श्वेताने शेअर केले!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 11:06 AM2020-09-15T11:06:16+5:302020-09-15T11:06:53+5:30

श्वेता सतत सुशांतचे काही जुने फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करत असते. आज तिने शेअर केलेले ५ खास व्हिडीओ आम्ही दाखवणार आहोत.

Watch 5 best unseen video of Sushant Singh Rajput shared by his sister Shweta Singh Kirti | बघा सुशांतचे ५ बेस्ट Unseen Video, जे त्याची बहीण श्वेताने शेअर केले!

बघा सुशांतचे ५ बेस्ट Unseen Video, जे त्याची बहीण श्वेताने शेअर केले!

googlenewsNext

सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्ती सुरूवातीपासूनच आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर एकही असा दिवस गेला नसेल जेव्हा भावासाठी श्वेताने सोशल मीडियात काही शेअर केलं नसेल. जसजसे दिवस पुढे जात आहे श्वेता सुशांतसाठी आपला आवाज आणखी जोमाने उठवत आहे. तिने ग्लोबल स्तरावर वेगवेगळे अभियान सुरू केले आहेत जेणेकरून तिच्या भावाला न्याय मिळावा. यादरम्यान श्वेताने सुशांतचा एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ती सुशांतच्या स्माइलबाबत बोलली आहे.

श्वेता सतत सुशांतचे काही जुने फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करत असते. आज तिने शेअर केलेले ५ खास व्हिडीओ आम्ही दाखवणार आहोत.

श्वेताने काही दिवसांपूर्वी एक उपक्रम सुरू केलाय. ज्यात बेघर आणि गरीब लोकांना जेवण देण्यात येतंय. या पोस्टमध्ये श्वेताने लिहिले की, 'चला आपण आपल्याकडून बेघर आणि गरीब लोकांचं पोट भरण्याचा प्रयत्न करू. हे करत असताना आपण डोळे बंद करून प्रार्थना करू. प्रार्थना करा की, लवकरच सत्य समोर यावं. सुशांतसाठी प्रार्थना आणि चांगलं काम करत राहू'. त्यासोबतच श्वेताने सोशल मीडियावर एक कॅम्पेन सुरू केलं. ज्यात तिने ग्लोबल प्रेअर मीटचं आयोजन केलं होतं. यात अनेकांनी सहभागी घेतला होता. 

हे पण वाचा :

बहिणीच्या अफेअरबाबत समजल्यावर कसा रिअ‍ॅक्ट झाला होता सुशांत? भावोजी विशालने शेअर केली पोस्ट

सुशांतचा हाऊस मॅनेजर नव्हे तर ड्रग्ज मॅनेजर होता सॅम्युअल मिरांडा, कॉल रेकॉर्डवरून झालं भांडाफोड 

सुशांत गरीबांच्या मदतीसाठी तयार करत होता मोबाइल App, डेन्मार्कच्या बिझनेसमनने केला खुलासा

Web Title: Watch 5 best unseen video of Sushant Singh Rajput shared by his sister Shweta Singh Kirti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.