Ncb investigate sushant singh rajput farm house on aapti gawande island rhea chakraborty drugs party | सुशांत सिंग राजपूतच्या फॉर्म हाऊसवर व्हायची ड्रग्स पार्टी?, NCBने तपासाची चक्र फिरवली

सुशांत सिंग राजपूतच्या फॉर्म हाऊसवर व्हायची ड्रग्स पार्टी?, NCBने तपासाची चक्र फिरवली

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत.रिया चक्रवर्तीने अभिनेत्री सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग आणि सिमोन यांची नावं घेतली आहेत.एनसीबीने सांगितले की अजूनपर्यंत यांना समन पाठवलेले नाही. तपास करत असताना एनसीबीची टीम सुशांतच्या फार्महाऊसवर पोहोचली आहे. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार, एनसीबीच्या टीमने इथल्या एका व्यक्तीचा जबाब नोंदवला आहे. या व्यक्तीने एनसीबीला सांगितले की, रिया चक्रवर्ती सुशांत सिंग राजपूतसोबत या फार्म हाऊसवर अनेक वेळा आली आहे. सुशांत मित्रांसोबत इथं पार्टी करायचा. 

फार्म हाऊसवर व्हायची ड्रग्स पार्टी?
ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर एनसीबी सुशांतच्या पवना डॅमजवळ असलेल्या फार्महाऊसची तपासणी करायला गेली होती. रिपोर्टनुसार इथल्या एका बोट चालवणाऱ्या व्यक्तीने एनसीबीच्या टीमला सांगितले की, रिया आणि साराला त्याने अनेक वेळा सुशांत सोबत बघितले आहे. त्याच बरोबर सुशांतसोबत श्रद्धा कपूरला सुद्धा याठिकाणी बघितल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. सुशांतच्या या फॉर्महाऊसवर ड्रग्स पार्टीचे आयोजन केले जायचं का?, या दृष्टिने तपास केला जातोय. 

समोर आलेल्या माहितीनुसार सुशांतसोबत दिपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा, शौविक चक्रवर्ती आणि जैदसुद्धा या फॉर्म हाऊसवर यायचे. सध्या ड्रग्स प्रकरणात हे सगळे न्यायालयीन कोठडीत आहेत. सुशांतच्या फॉर्महाऊसवर सगळे मिळून पार्टी करायचे अशी माहिती आहे. या पार्टीत मद्यप्राशन केले जायचं. तसेच अशी भीती आहे की तिथे ड्रग्स पार्टी देखील होती असावी. एनसीबी आता सुशांतबरोबर येथे येणाऱ्या इतर लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.


सुशांतच्या फार्म हाऊसमधून वस्तू जप्त
तपास पथकाला सुशांतच्या फार्म हाऊसमधून हुक्का पिण्याच्या वस्तूही सापडल्या आहेत. एनसीबी ड्रग्स कनेक्शनच्या संदर्भात अनेक कान्याकोपऱ्यातून सातत्याने चौकशी करत असते.. यापूर्वी एनसीबीने आपल्या रिमांड कॉपीमध्ये दावा केला होता की, रिया आणि इतर साथीदार सुशांत सिंग राजपूत यांच्या सांगण्यावरून ड्रग्ज मागत असत, हाच जबाब रिया आणि अटक केलेल्या लोकांनी एनसीबीला दिले आहेत.


सुशांत सिंग राजपूत याच्या ड्रग्ज प्रकरणात थेट संबंध असणार्‍या अनेक ड्रग पेडलर्सना एनसीबीने आतापर्यंत अटक केली आहे. तसेच, बॉलिवूडमधील ड्रग्स कार्टेलशी त्याचा संबंधही समोर आला आहे. सोमवारीच एनसीबीने हाय-फाय ड्रग्स पार्टीचा संबंध असलेल्या शोविकचा मित्र सूर्यदीप मल्होत्रा याला ताब्यात घेतले आहे. एनसीबी आता सूर्यदीपची चौकशी करेल, ज्यात बर्‍याच नवीन गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे, अशी माहित आज तकने दिली आहे.

बॉलिवूडमधील 'हा' मोठा दिग्दर्शक रिया विरोधात केस करण्याच्या तयारीत, ड्र्ग्स केसमध्ये घेतलंं होतं त्याचं नाव!

 

 

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ncb investigate sushant singh rajput farm house on aapti gawande island rhea chakraborty drugs party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.