बॉलिवूडमधील 'हा' मोठा दिग्दर्शक रिया विरोधात केस करण्याच्या तयारीत, ड्र्ग्स केसमध्ये घेतलंं होतं त्याचं नाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 11:41 AM2020-09-15T11:41:04+5:302020-09-15T11:41:29+5:30

अटक झाल्यानंतर रियाने एनसीबीसमोर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या नावांच्या खुलासा केलाय. हे लोक ड्रग्स घेत असल्याचा दावा रियाने केला. यातील एक मोठं नाव म्हणजे निर्माता-दिग्दर्शक मुकेश छाबडा.

Mukesh Chhabra may file a case against Rhea Chakraborty for naming him in the drugs angle | बॉलिवूडमधील 'हा' मोठा दिग्दर्शक रिया विरोधात केस करण्याच्या तयारीत, ड्र्ग्स केसमध्ये घेतलंं होतं त्याचं नाव!

बॉलिवूडमधील 'हा' मोठा दिग्दर्शक रिया विरोधात केस करण्याच्या तयारीत, ड्र्ग्स केसमध्ये घेतलंं होतं त्याचं नाव!

googlenewsNext

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ड्रग्स विकत घेतल्याच्या आरोपात रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली आहे. ती सध्या भायखळा तुरूंगात आहे. अटक झाल्यानंतर रियाने एनसीबीसमोर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या नावांच्या खुलासा केलाय. हे लोक ड्रग्स घेत असल्याचा दावा रियाने केला. यातील एक मोठं नाव म्हणजे निर्माता-दिग्दर्शक मुकेश छाबडा. आता मुकेश छाबडा रिया विरोधात केस करण्याच्या तयारीत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार मुकेश छाबडा रिया चक्रवर्तीवर सूडाची भावनेसोबत बदनाम करण्याची केस दाखल करू शकतो. यावर आपली बाजू मांडताना मुकेश छाबडा म्हणाला की, 'मी कधीच दारूही प्यायलो नाही तर ड्रग्सचा विषयच येत नाही. रियाने माझं नाव केवळ सूड घेण्यासाठी घेतलंय. आणि तिने ज्यांचही नावे घेतली ती सुद्धा तिने अशीच घेतली आहेत'.

'मी कधी दारू प्यायलो नाही, तर...'

मुकेश छाबडा पुढे म्हणाला की, 'रियाला वाटतं की, असं करून तिला केसमध्ये मदत मिळेल. पण हे चुकीचं आहे. माझा ड्रग्सशी काहीही संबंध नाही. मी कधीच सिगारेट आणि दारूही प्यायलो नाहीय. तर हार्ड ड्रग्स घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. सध्या मी हेच बघतो आहे की, काय करणं  जास्त योग्य ठरेल. पण मला रियाला हाच सल्ला द्यायचा आहे की, तिने स्वत:वरून लक्ष हटवण्यासाठी दुसऱ्यांची नावे घेऊ नये. याने तिला काहीही मदत मिळणार नाही. मी दुसऱ्यांबाबत बोलू शकत नाही. पण माझं नाव या केसमध्ये केवळ सूड घेण्यासाठी ओढलं गेलं आहे'.

मुकेश छाबडा म्हणाला की, तो त्याच्या नावाचा गैरवापर होऊ देणार नाही. तो रिया विरोधात लीगल अॅक्शन नक्की घेणार आहे. रियाकडून त्याची बदनामी केली जात आहे. मुकेश छाबडा हाच सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा' चा दिग्दर्शक आहे.

सारा आणि रकुलचं नाव

रियाने एनसीबीसमोर सारा अली खान, रकुर प्रीत सिंह, सीमोन खंबाटा, रोहिणी अय्यर आणि मुकेश छाबडासहीत २५ लोकप्रिय लोकांची नावे घेत सांगितले होते की, हे लोक ड्रग्स घेतात. रियाने एजन्सीला सांगितले होते की, बॉलिवूडमधील ८० टक्के स्टार ड्रग्सचं सेवन करतात. आता हे सगळे लोक एनसीबीच्या रडारवर आहे. 

मिरांडा ड्रग्स मॅनेजर

दरम्यान, सुशांत प्रकरणात रियाच्या ड्रग गॅंग आणि ड्रग स्मगलर यांच्यातील संभाषणाविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज तकच्या हाती लागलेल्या कॉल डिटेल रेकॉर्डवरून असे दिसते की, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा खरंतर सुशांतचा ड्रग्ज मॅनेजर बनला होता. ड्रग पेडलर्सच्या सीडीआरमध्ये सॅम्युअलचा मोबाईल क्रमांक बर्‍याच वेळा दिसून येत आहे आणि त्याने ड्रग्ज विक्रेत्यांशी तासन् तास चर्चा केली असल्याचं उघडकीस आलं आहे.

रिया चक्रवर्तीची ड्रगशी जोडलेली मंडळी मुंबईतील विविध बदनाम ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. जेव्हा एनसीबीने या अंमली पदार्थ तस्कर आणि सुशांतच्या कर्मचार्‍यांच्या कॉल डिटेल रेकॉर्डची तपासणी सुरू केली, तेव्हा एकामागून एक धक्कादायक खुलासे होऊ लागले. सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा हा सर्व ड्रग तस्करांच्या संपर्कात होता. रिया आणि सुशांतच्या सांगण्यावरून ड्रग्जची व्यवस्था करत असे हे पुढे उघडकीस आले.

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

सुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू

आपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, ड्रग्स चॅटिंगसाठी करायची आईच्या फोनचा वापर

Web Title: Mukesh Chhabra may file a case against Rhea Chakraborty for naming him in the drugs angle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.