वीज बिलाचा आकडा पाहून रेणुका शहाणेला  बसला शॉक, फोटो शेअर करत व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 10:26 AM2020-06-29T10:26:37+5:302020-06-29T10:26:55+5:30

वीज बिलाचे आकडे पाहून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच शॉक्ड आहेत. 

actress renuka shahane angry reaction on her electricity bill shared photo | वीज बिलाचा आकडा पाहून रेणुका शहाणेला  बसला शॉक, फोटो शेअर करत व्यक्त केला संताप

वीज बिलाचा आकडा पाहून रेणुका शहाणेला  बसला शॉक, फोटो शेअर करत व्यक्त केला संताप

googlenewsNext
ठळक मुद्देकाल तापसी पन्नूनेही वीजबिलाचा स्क्रिनशॉट शेअर करत संताप व्यक्त केला होता.

गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत मार्च महिन्यांत लॉकडाऊन केले गेले आणि लोक आपआपल्या घरात कैद झालेत. आता लॉकडाऊन हळूहळू अनलॉक होतोय आणि याचदरम्यान हैराण करणा-या बातम्या येत आहेत. वीज बिलाचे आकडे पाहून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच शॉक्ड आहेत. काल बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने वीजबिलाचा 36 हजारांचा आकडा पाहून संताप व्यक्त केला होता. आता तिच्या पाठोपाठ अभिनेत्री रेणुका शहाणे हिने वीज बिलावर संताप व्यक्त केला आहे. अचानक वीज बिलाचा आकडा इतका फुगला कसा? असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने केला आहे.
रेणुकाने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

 ‘मे महिन्यात माझे लाईट बिल ५५१० रुपये होते. त्यानंतर जून महिन्याचे २९,७०० रुपये आले. या महिन्याच्या बिलामध्ये मे आणि जूनचे एकत्र बिल देण्यात आले आहे. तुम्ही मे महिन्याचे बिल १८०८० रुपये दाखवले आहे. पण माझे बिल ५५१० रुपयांवरुन १८०८० रुपये कसे झाले?, असा सवाल तिने केला आहे.
तिच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तिला याविरोधात आवाज उठवण्याचा तर काहींनी उपोषणावर बसण्याचा सल्ला दिला आहे.

काल तापसी पन्नूनेही वीजबिलाचा स्क्रिनशॉट शेअर करत संताप व्यक्त केला होता. ‘लॉकडाऊनच्या तीन महिन्यांत मी कोणती नवी उपकरणे मी वापरली आहेत किंवा नव्याने विकत आणली आहेत ज्यामुळे मला इतके वीजबिल आले आहे. नेमक्या कोणत्या वीजेचे शुल्क आकारत आहात?,’ असा संतप्त सवाल  तापसीने ट्विटच्या माध्यमातून तिने केला होता.

Read in English

Web Title: actress renuka shahane angry reaction on her electricity bill shared photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.