अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली; सिनेमाची कहाणी प्रत्यक्षात घडली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 08:44 AM2023-10-08T08:44:06+5:302023-10-08T08:59:34+5:30

नुसरत भरुचासोबत संपर्क होत नसला तरी तिला सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असं तिच्या टीमकडून सांगण्यात येत आहे.

Actress Nushrat Bharucha Stuck In Israel Amid Ongoing War | अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली; सिनेमाची कहाणी प्रत्यक्षात घडली

अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली; सिनेमाची कहाणी प्रत्यक्षात घडली

googlenewsNext

जेरुसलेम - इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान बॉलिवूडमधूनही अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या टीममधील एका सदस्याने या बातमीला दुजोरा दिला आहे.

मीडियाला सांगितलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली आहे. ती हाइफा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी तिथे गेली होती. नुसरत भरुचाशी शनिवारी दुपारी १२.३० वाजता शेवटचा संपर्क करण्यात आला होता. ती त्याठिकाणी एका बेसमेंटमध्ये असून सुरक्षित असल्याचे कळाले. सुरक्षेच्या कारणास्तव आणखी माहितीचा खुलासा केला जाऊ शकत नाही. परंतु तेव्हापासून अद्याप तिच्याशी संपर्क होत नसल्याचे म्हटलं आहे.

तसेच नुसरत भरुचासोबत संपर्क होत नसला तरी तिला सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ती सुखरुप आणि सुरक्षित भारतात परत येईल अशी आम्हाला आशा आहे असंही तिच्या टीमकडून सांगण्यात आले आहे. अलीकडेच अभिनेत्री नुसरत भरुचाचा सिनेमा अकेली प्रदर्शित झाला होता. या फिल्मची कहाणी एक मुलगी इराक सिव्हिल वॉरमध्ये काही कारणास्तव अडकते. हा सिनेमा युद्धाच्या वातावरणात अडकलेल्या एका मुलीच्या घरी परतण्याच्या संघर्षावर आधारित आहे.

रिलमधून रिअलमध्ये बनली कहाणी

नुसरतने इन्स्टाग्रामवर चाहत्यांना सिनेमा पाहण्याचं आवाहन करत ट्रेलरचा व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ शेअर करताना ती म्हणाली की, अकेली- जीवनाच्या सुरक्षेसाठी एका सर्वसामान्य मुलीची लढाई, नुसरत भरुचाची ही फिल्म एका भारतीय मुलीवर आहे. जी युद्धकाळात इराकमध्ये एकटी अडकते. इतक्या अडथळ्यांमध्येही ती जिवंत राहण्यासाठी संघर्ष करत असते असं या सिनेमात दाखवण्यात आले आहे.

हमासने केला इस्रायलवर हल्ला

शनिवारी पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने अवघ्या २० मिनिटांत इस्रायलवर ५ हजार रॉकेट डागले. या हल्ल्यात आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याचबरोबर अनेक इस्रायली सैनिक आणि नागरिकांना ओलीस ठेवल्याचा दावा हमासने केला आहे. इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात १९८ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे १५०० जखमी झाले. हमासने संपूर्ण नियोजनासह इस्रायलला लक्ष्य केले, ज्यासाठी ते बऱ्याच काळापासून तयारी करत होते.

Web Title: Actress Nushrat Bharucha Stuck In Israel Amid Ongoing War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.