Actress Kareena Kapoor Khan spoke on nepotism, She says do not go to watch star kids movie | नेपोटिज्मवर बोलली करिना कपूर, म्हणाली - ...तर स्टार किड्सचे सिनेमे बघू नका, झाली ट्रोल...

नेपोटिज्मवर बोलली करिना कपूर, म्हणाली - ...तर स्टार किड्सचे सिनेमे बघू नका, झाली ट्रोल...

बॉलिवूडमध्ये कमी काळात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमधील नेपोटिज्मवर वाद पेटला आहे. याआधी कधीही इतकी चर्चा झाली नाही तेवढी आता होत आहे. या वादावर बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्री आपली मते मांडत आहेत. यात करिना कपूरही मागे नाही.

बॉलिवूडमधील नेपोटिज्मच्या वादात आता कपूर खानदानाने उडी घेतली आहे. कपूर खानदानातील मुलगी आणि सैफ अली खानची पत्नी करिना कपूरने नेपोटिज्मवर आपलं परखड मत मांडलं आणि हे मत मांडत असताना प्रेक्षकांना एकप्रकारे या नेपोटिज्मला दोषी मानलं आहे.

करिना कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पत्रकार बरखा दत्तच्या प्रश्नांना करिना उत्तर देत आहे. यात करिना म्हणाली की, 'प्रेक्षकच स्टार किड्सना स्टार बनवतात. दुसरं कुणी हे काम करत नाही'. ती म्हणाली की, 'नेपोटिज्मवर बोट उचलणाऱ्यांनी आधी प्रेक्षकांवरही यासाठी बोट उचलावं की, नेपोटिस्टिक स्टार कोण बनवतं. तुम्ही जाताय ना स्टार किड्सचे सिनेमे बघायला. जाऊ नका. नोबडी हॅज फोर्स्ड यू. या जुन्या विषयावर चर्चा करणं बेकार आहे'.

करिनाच्या या व्हायरल व्हिडीओवर लोक भरभरून आणि वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काही लोक तिच्या मताशी सहमत आहे तर काही लोकांनी बॉलिवूडमधील लॉबिंगचा विषय उपस्थित केला. एक ट्विर यूजर तर म्हणाला की, 'एरोगन्समध्ये बोलली खरी, पण आता बघ ऑडिअन्स पॉवर'.

हे पण वाचा :

रणबीरला ‘रेपिस्ट’, दीपिकाला ‘सायको’ म्हणायची हिंमत का होत नाही? कंगना राणौत पुन्हा बिथरली

सुशांत अन् रियाचे झाले होते कड्याकाचे भांडण; दोघांनीही एकमेकांवर उचलला होता हात

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Kareena Kapoor Khan spoke on nepotism, She says do not go to watch star kids movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.