17 तासांच्या प्रसूती कळा अन् साफोचा जन्म...! कल्की कोच्लिनने मानले डॉक्टरांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 12:54 PM2020-02-11T12:54:49+5:302020-02-11T14:13:57+5:30

शेअर केला साफोचा पहिला फोटो

actress kalki koechlin struggle 17 hours of labour pain share first glimpses of newborn | 17 तासांच्या प्रसूती कळा अन् साफोचा जन्म...! कल्की कोच्लिनने मानले डॉक्टरांचे आभार

17 तासांच्या प्रसूती कळा अन् साफोचा जन्म...! कल्की कोच्लिनने मानले डॉक्टरांचे आभार

googlenewsNext
ठळक मुद्दे2009 मध्ये ‘देव डी’ या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. पण

कल्की कोच्लिनने 7 फेब्रुवारीला मुलीला जन्म दिला आहे.   एका इमोशनल पोस्टद्वारे कल्कीने आपल्या मुलीचे स्वागत केले. सोबत तिचे नावही जाहिर केले. कल्कीने ‘साफो’ असे मुलीचे नामकरण केले आहे. आता साफोचा पहिला फोटो समोर आला आहे. कल्कीने स्वत: मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. सोबत डॉक्टरांचेही आभार मानले आहेत. या फोटोंमध्ये कल्कीचा बॉयफ्रेन्ड गाय हर्शबर्ग हाही दिसतोय. कल्की व हर्शबर्ग यांनी अद्याप लग्न केलेले नाही. लग्नाआधीच दोघांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला.


‘’च्या संपूर्ण टीमचे आभार... 17 तासांच्या प्रसूती वेदना सहन करताना मला धीर देणा-या माझ्या डॉक्टरांचेही आभार, असे कल्कीने हे फोटो शेअर करताना लिहिले आहे. मुलीच्या जन्मावेळी सोसलेल्या प्रचंड प्रसूतीवेदनेबद्दलही कल्कीने लिहिले आहे. ‘17 तास मी प्रसूती कळा सोसत होते. अखेर मी दमून गेले, गळून गेले. मी हार पत्करली. काहीही करा पण माझ्या बाळाला या जगात आणा, अशी आर्जव मी डॉक्टरांकडे केली. पण डॉक्टरांनी मला धीर दिला. तू इतक्या हिंमतीने वॉटरबर्थसाठी प्रयत्न केलेस. आणखी थोडा धीर धर, असे डॉक्टर मला म्हणाले आणि तासाभरानंतर साफोचा जन्म झाला... तुम्ही खरचं खूप महान आहात,’ असे कल्कीने लिहिले आहे.

काल एका पोस्टमध्ये कल्कीने प्रसूतीवेदना सहन करून नवा जीव जन्मास घालणाºया महिलांचा आदर करा, असे आवाहन केले होते. नवा जीव जन्मास घालताना महिलेला शारिरीक व मानसिकदृष्ट्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याऊपरही तिला सन्मान मिळत नाही, असे तिने लिहिले होते.

Web Title: actress kalki koechlin struggle 17 hours of labour pain share first glimpses of newborn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.