'K.G.F Chapter 2' आधी रॉकी भाईने दाखवला जोश, शेअर केला सिंहासोबतचा खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 04:38 PM2021-10-14T16:38:21+5:302021-10-14T16:42:03+5:30

Actor Yash : अभिनेता यशने (Yash) एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम वॉलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून फॅन्स त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.

Actor Yash showed his strength before kgf chapter 2 see the video with the white tiger | 'K.G.F Chapter 2' आधी रॉकी भाईने दाखवला जोश, शेअर केला सिंहासोबतचा खास व्हिडीओ

'K.G.F Chapter 2' आधी रॉकी भाईने दाखवला जोश, शेअर केला सिंहासोबतचा खास व्हिडीओ

Next

लोकांच्या मनात आपल्या स्टाइलची छाप सोडणारा अभिनेता 'केजीएफ चॅप्टर २' (KGF Chapter 2) स्टार यश (Yash) रिअल लाइफमध्येही सुपरस्टार आहे. साउथ सिनेमातील सुपरस्टार यशने आपल्या या सिनेमाने प्रत्येकाला वेड लावलं आहे. लोक आतुरतेने त्याच्या सिनेमाची वाट बघत आहेत. अशातच यशने त्याच्या फॅन्ससाठी एक व्हिडीओ शेअर करून सरप्राइज दिलं आहे. या व्हिडीओत यश एका पांढऱ्या सिंहासोबत दिसत आहे. 

अभिनेता यशने एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम वॉलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून फॅन्स त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. या व्हिडीओत बघू शकता की, यश किती कॉन्फिडन्समध्ये सिंहाला खाऊ घालत आहे. यशच्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, त्याने एक प्रिन्टेड शर्ट घातला आहे. सोबत तो समोर उभा असलेल्या सिंहाला खाऊ घालत आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. पण त्याहीपेक्षा या व्हिडीओवरील कमेंट्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका यूजरने लिहिलं आहे की, 'एका सिंहासोबत दुसरा सिंह'. एका दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे की, 'क्या बात है रॉकी भाई'.

'KGF Chapter 2' च्या रिलीजबाबत बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. प्रॉडक्शन हाऊस होम्बले फिल्म्सने या सिनेमाच्या रिलीजसाठी दक्षिण आधारित झी चॅनल्ससोबत करार केला आहे. या सिनेमात यशसोबत संजय दत्त, रविना टंडन श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रशां नीलने केलं आहे.
 

Web Title: Actor Yash showed his strength before kgf chapter 2 see the video with the white tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app