लघीनघाई सुरू! अभिनेता वरूण धवन गर्लफ्रेंड नताशासोबत या महिन्यात अडकणार लग्नबेडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 12:37 PM2021-01-13T12:37:35+5:302021-01-13T12:37:59+5:30

गेल्या काही दिवसांपासून वरूण धवनच्या लग्नाची चर्चा ऐकायला मिळते आहे.

Actor Varun Dhawan will tie the knot with his girlfriend Natasha this month | लघीनघाई सुरू! अभिनेता वरूण धवन गर्लफ्रेंड नताशासोबत या महिन्यात अडकणार लग्नबेडीत

लघीनघाई सुरू! अभिनेता वरूण धवन गर्लफ्रेंड नताशासोबत या महिन्यात अडकणार लग्नबेडीत

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. विशेष बाब म्हणजे त्याच्यावर तरूणी जास्त फिदा आहेत. मात्र आधीपासून वरूण धवनच्या आयुष्यात एक मुलगी असून तिचे नाव नताशा दलाल आहे. ते दोघे बऱ्याचदा इव्हेंट किंवा इतर ठिकाणी एकत्र पहायला मिळतात. इतकेच नाही तर त्यांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून वरूण धवनच्या लग्नाची चर्चा ऐकायला मिळते आहे. दरम्यान आता समजते आहे की, ते दोघे या महिन्यात लग्न करणार आहेत.


खरेतर, २०२० मध्ये वरूण धवन आणि नताशा दलाल लग्न करणार होते. मात्र कोरोना व्हायरसच्या संकटामुळे शक्य झाले नाही. आता आज तकच्या रिपोर्ट्सनुसार, वरूण धवन याच महिन्यात नताशासोबत बोहल्यावर चढणार आहे. लग्नाच्या तयारीला देखील सुरूवात झाली आहे आणि वरूण सध्या लग्नाचे ठिकाण फायनल करण्यात व्यस्त आहे.


पिंकव्हिलाच्या रिपोर्ट्सनुसार, वरूण धवन अलिबागमध्ये लग्न करण्याच्या तयारीत आहे. यासाठी तो नुकताच तिथल्या फाइव्ह स्टार हॉटेल बुक करण्यासाठी अलिबागला गेला होता. हे एक ग्रॅण्ड पंजाबी वेडिंग असणार आहे. मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे या लग्न सोहळ्याला खास पाहुण्यांना निमंत्रण दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. २०० लोकांची यादी लग्नाच्या निमंत्रणासाठी फायनल करण्यात आली आहे.


वरूण धवन बऱ्याच कालावधीपासून नताशासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. त्याने आपल्या करिअरच्या सुरूवातीला कित्येक वर्षे नताशासोबतचे नाते लाइमलाइटमध्ये आणले नव्हते. मात्र काही कालावदीनंतर बऱ्याच खास क्षण त्यांना एकत्र येत त्यांनी रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले. 


फिल्मफेअरला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वरूणने सांगितले की, सर्व या बद्दल बोलत आहेत. मात्र सध्या संपूर्ण जग कित्येक अडचणीत आहे.
जर सर्व काही ठीक असते तर लवकरच लग्नाच्या तयारीबद्दल विचार करू शकलो असतो. मात्र अजून थोडी आणि क्लियरिटीची गरज आहे.


वरूण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच त्याचा कुली नंबर १ चित्रपट रिलीज झाला. यात त्याच्यासोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत होती.

Web Title: Actor Varun Dhawan will tie the knot with his girlfriend Natasha this month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.