शाहरुख खानसोबतच्या एक सीनमुळे सनी देओलचा दिग्दर्शकाबरोबर झाला होता वाद, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 01:52 PM2021-05-17T13:52:34+5:302021-05-17T13:52:51+5:30

सनी दिओल (Sunny Deol) ने आपल्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.

Actor sunny deol angry with yash chopra for seen with srk in darr | शाहरुख खानसोबतच्या एक सीनमुळे सनी देओलचा दिग्दर्शकाबरोबर झाला होता वाद, कारण वाचून व्हाल हैराण

शाहरुख खानसोबतच्या एक सीनमुळे सनी देओलचा दिग्दर्शकाबरोबर झाला होता वाद, कारण वाचून व्हाल हैराण

Next

सनी दिओल (Sunny Deol) ने आपल्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला सनी दिओलशी निगडीत एक किस्सा सांगणार आहोत, जो डर सिनेमाशी संबंधीत आहे. 1993 मध्ये  यश चोप्रा 'डर' सिनेमा तयार करत होते,  ज्यात जूही चावला  (Juhi Chawla)  आणि शाहरुख खान  (Shahrukh Khan)देखील मुख्य भूमिकेत होते.

या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दिग्दर्शक यश चोप्रा आणि सनी देओल यांच्यात एका सीनला घेऊन वाद झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख सनीला चाकू मारणार  होता होता, हा सीन शूट करायला सनी देओल तयार नव्हता, कारण सनी म्हणतो आहे की तो चित्रपटात कमांडो बनला आहे आणि जर कोणी मुलगा येईल आणि त्याला वार करेल तर तो कमांडो कसा. यश चोप्रा यांनी समजल्यानंतर अखेर सनी देओल तयार झाला. मीडिया रिपोर्टनुसार सनी खरोखरच रागावला होता जेव्हा हा सीन शूट केला जात होता.

सनी देओल 16 वर्षे शाहरुख खानशी बोलला नव्हता
 नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सनीला जेव्हा विचारण्यात आले की, सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्याच्याबाबत इतरांच्या मनात भिती निर्माण झाली होती का ?, यावर तो म्हणाला, त्यांच्याच मनात काहीतरी कटूता राहिली असेल. ज्यामुळे त्यांच्या मनात भिती होती. त्यानंतर सनीला तू 'डर'नंतर 16 वर्षे शाहरुखशी बोलला नाहीस का असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांने होकारार्थी उत्तर दिले. या भांडणामागचे कारण सांगताना सनी म्हणाला, शेवटी सिनेमात लोकांनी मला पसंत केले. शाहरुखला सुद्धा केलं. सिनेमाला घेऊन मला फक्त ऐवढीच अडचण होती की मला माहिती नव्हते यात व्हिलनची भूमिकासुद्धा इतकी महत्त्वाची आहे. मी सिनेमात नेहमी स्वच्छंद मनाने आणि लोकांवर विश्वास ठेवून काम करतो. मात्र सगळेच कलाकार तसं करत नाहीत.  कदाचित त्यांना स्टारडम हवी असते. रिपोर्टनुसार सनीने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तो यश चोप्रा यांच्यासोबत काम करणार नाही कधी. सनीचे म्हणणे होते की, यश चोप्राने त्याला धोका दिला होता.

Web Title: Actor sunny deol angry with yash chopra for seen with srk in darr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app