मस्ट वॉच !! पाहायला विसरू नका या पाच ‘धाकड’ बेवसीरिज...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 08:00 AM2020-02-10T08:00:00+5:302020-02-10T08:00:02+5:30

काही अपकमिंग वेबसीरिज....

5 Upcoming Indian Shows That Are Going To Keep Us Hooked To Our Screens | मस्ट वॉच !! पाहायला विसरू नका या पाच ‘धाकड’ बेवसीरिज...!

मस्ट वॉच !! पाहायला विसरू नका या पाच ‘धाकड’ बेवसीरिज...!

googlenewsNext

चित्रपटगृहांत जाण्याऐवजी घरी निवांत बसून वेब शो एन्जॉय करणा-यांपैकी असाल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. होय, येत्या काळात अनेक रोमांचक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अशाच काही अपकमिंग वेबसीरिजबद्दल...


दिल्ली (Dilli)


भारतीय राजकारणावर केंद्रीत ‘दिल्ली’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. यात सैफ अली खान व अमायरा दस्तूर मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय डिम्पल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, गौहर खान, मोहम्मद जिशान अय्युब यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘टायगद जिंदा है’ फेम दिग्दर्शक अली अब्बास जफर या वेबसीरिजद्वारे वेबदुनियेत पदार्पण करतोय

मिर्झापूर 2 (Mirzapur 2)

2018 मध्ये अ‍ॅमेझॉन प्राईमवर  मिर्झापूर ही वेबसीरिज रिलीज झाली होती. या वेबसीरिजने इंटरनेटच्या दुनियेत धम्माल केली होती. आता याच वेबसीरिजचे दुसरे सीझन डिजिटलप्रेमी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. माफिया डॉन, ड्रग्ज, भ्रष्टाचार यावर केंद्रीत या वेबसीरिजमध्ये पुन्हा एकदा पंकज तिवारींचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

द लास्ट अवर (The Last Hour)

हिमालयाच्या कुशीत साकारलेली ‘द लास्ट अवर’ ही सुपरनॅचरल थ्रीलर वेबसीरिज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मान्सून शूटआऊट फेम अमित कुमार दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये संजय कपूर व रायमा सेन मुख्य भूमिकेत आहेत.

फोर मोअर शॉट्स प्लीज 2 (Four More Shots Please 2)


ही ती वेबसीरिज आहे, ज्यावरून निर्माता प्रितीश नंदी आणि अनुराग कश्यप यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. प्रितीश या वेबसीरिजला ‘वुमानिया’ हे नाव देऊ इच्छित होते. हा शब्द अनुरागच्या एका चित्रपटाच्या गाण्यातून घेतला होता. यावरून दोघांत वाद झाला होता. या वेबसीरिजचे पहिले सीझन लोकांना प्रचंड आवडले होते. आता दुसरे सीझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. किर्ती कुल्हारी, मानवी गबरू, बानी जे, सयानी गुप्ता यात मुख्य भूमिकेत आहेत.

मुंबई डायरिज 26/11 (Mumbai Diaries – 26/11)

मुंबईतील 26/11 हल्ल्यावर आधारित या वेबसीरिजमध्ये कोंकणा सेन, टीना देसाई, मोहित रैना मुख्य भूमिकेत आहेत. निखील अडवाणी दिग्दर्शितने ही वेबसीरिज दिग्दर्शित केली आहे.


 

Web Title: 5 Upcoming Indian Shows That Are Going To Keep Us Hooked To Our Screens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.