बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाल्यावर सेलिब्रेटी सतत लाइमलाइटमध्ये येत असतात. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांचे काही फोटो वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. असेच बॉलिवूडच्या सेलिब्रेटींचे फोटो जे खूप वादग्रस्त ठरले आणि या फोटोंवरून त्यांना खूप ट्रोल करण्यात आले. 

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा हा फोटो एका इव्हेंटमधील आहे. जिथे अक्षय कुमार एका जीन्स ब्रॅण्डला प्रमोट करत होता. या दरम्यान त्याने त्याच्या पॅण्टचे बटण पत्नी ट्विंकल खन्नाकडून खोलले होते. तसे तर स्क्रीप्टमध्ये अक्षय कुमार जीन्सचे बटण एका मॉडेलकडून खोलून घेणार असे होते. असे करणे अक्षयला खूप महागात पडले होते. कारण एका व्यक्तीने अक्षयची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये केली होती. त्यामुळे त्याला पोलीस स्टेशनला फेऱ्या माराव्या लागल्या होत्या.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहत असते. असेच एकदा ती एका पार्टीत खूप दारू प्याली होती. त्यावेळी तिला अजिबात भान नव्हते. तिला तिच्या एका मित्राला पकडावे लागत होते. यादरम्यान चुकून तिच्या मित्राचा हात कतरिनाच्या ड्रेसच्या आत गेला होता. तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता आणि तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.

कतरिना कैफ व राणी मुखर्जी यांचा एक फोटो आहे ज्यात त्या दोघी एकमेकांना किस करताना दिसत आहे. खरेतर या फोटोमागची पार्श्वभूमी काही वेगळी आहे. त्या दोघी एकमेकांच्या गळाभेट घेत होत्या. त्यादरम्यान कॅमेरा अँगेलमुळे असे काही दिसले की त्या दोघी एकमेकांना किस करताना दिसल्या. या फोटोवरही खूप टीका झाली होती.

या फोटोत ऐश्वर्या राय व अजय देवगण आहेत. ते दोघे एका अवॉर्ड फंक्शनला गळाभेट घेत होते. यादरम्यान ऐश्वर्याने डोळे बंद केले आणि चुकून अजय देवगणच्या ओठावर किस केली. तिच्या या छोट्याशा चुकीवर तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते. चूक असो किंवा नसो पण ते दोघे लाजरेबुजरे झाले होते.

ऐश्वर्या राय बॉलिवूडची सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची सून आहे. या फोटोत ती सासरे म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या गालावर किस करत होती. पण लांबून फोटो क्लीक केला असल्यामुळे असे वाटत होते की ती त्यांच्या ओठावर किस करते आहे. या फोटोत कोणाची चूक नव्हती पण हा फोटो खूप व्हायरल झाला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 5 Controversial Photos Of Bollywood Stars Going Viral On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.