बॉलिवूडमध्ये पती प्रसिद्ध कलाकार असला तरी अनेकांच्या पत्नी आणि मुलांना लाईमलाइटमध्ये यायला आवडत नाही. काही खास सोहळ्यांमध्येच ती समोर येतात. अभिनेता सनी देओलची पत्नी पूजा देओलला देखील लाईमलाइटमध्ये यायला आवडत नाही. मीडियाच्या कॅमे-या समोर ती क्वचितच पाहायला मिळते. अलीकडेच मुलगा करण देओलचा पहिला सिनेमा 'पल पल दिल  के पास ’ सिनेमाच्या स्क्रिनिंगला हजरी लावली होती.तेव्हा एरव्ही कधीच समोर न येणारी पूजा देओल केवळ आपल्या मुलाखातर मीडिया समोर आली होती.   सनी देओल आणि पूजा देओलचे १९८४ मध्ये लग्न झाले आहे. 

सोशल मीडियावरही या कपलच फोटो पाहायला मिळत नाही. पत्नी पूजाबरोबरसनी देओल सोशल मीडियावर फोटो शेअर करत नाही. दोघांनाही त्यांचे प्रोफेशनल आणि खाजगी गोष्टी सार्वजनिकरित्या मांडायला आवडत नाही. इतकेच काय सनी आणि पूजाने त्यांच्या लग्नाची बातमीदेखील मीडियापासून लपवून ठेवली होती. या दोघांच्या लग्नाला ३६ वर्षाहून अधिक काळ झाला आहे. सनीने त्याच्या करिअरला सुरूवात करण्याआधीच लग्न केले होते.

सनीने जेव्हा रूपेरी पडद्यावर एंट्री केली तेव्हा हळुहळु त्याची लोकप्रियतादेखील वाढु लागली होती. धर्मेंद्र यांनीच सनीचे लग्न जगासमोर येऊ दिले नसल्याचे बोलले जाते. लग्नानंतर खूप दिवस पूजा लंडनमध्ये राहिल्या. सनी देखील पूजा यांना भेटण्यासाठी लपून छपून लंडनला येऊन जाऊन असायचा.

जेव्हा  मीडियामध्ये या दोघांच्या लग्नाच्या बातम्या यायला सुरू झाल्या तेव्हाही  लग्नाची बातमी सनीने नाकारली होती. काही काळानंतर सनीनेच लग्न झाल्याची बातमी  खरी असल्याची मीडियाला सांगितले होते. आजही सनीने आपली पत्नी आणि आपल्या लाइफ बद्दलच्या गोष्टी प्राइवेटच ठेवणे पसंत करतो.

लग्नानंतर आजपर्यंत पूजानेही कधीच सनीबरोबरचे फोटो जगासमोर येऊ दिले नाहीत. मुलगा करण देओल मदर्स डेच्या निमित्ताने आई बरोबरचे फोटो शेअर करत असतो. तेवढेच पूजा देओलचे फोटो जगासमोर आले आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 36 years ago, Sunny Deol hide His Marriage from Fans, wife Pooja Deol Still Stays Away from publicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.