अभिनेत्री नोरा फतेहीच्या इन्स्टाग्रामवर फॉलोवर्सने पार केला इतक्या कोटींचा टप्पा, देसी लूकमधला शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 16:23 IST2020-08-11T16:14:29+5:302020-08-11T16:23:05+5:30
नोरा फतेही तिच्या दिलखेचक डान्ससाठी ओळखली जाते.

अभिनेत्री नोरा फतेहीच्या इन्स्टाग्रामवर फॉलोवर्सने पार केला इतक्या कोटींचा टप्पा, देसी लूकमधला शेअर केला फोटो
बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार डान्सने आपलं वेगळं स्थान निर्माण केलेली आणि कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावरही बरीत अॅक्टिव्ह असते.
नोरा फतेही तिच्या दिलखेचक डान्ससाठी ओळखली जाते. तसेच नोरा बऱ्याचदा सोशल मीडियावरील व्हिडिओ व फोटोंमुळे चर्चेत येत असते. नोराचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 1.5 कोटी फॉलोवर्स झाले आहेत. नोराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत नोरा देसी लूकमध्ये दिसते आहे. साडीसोबत नोराने नाकात नथ सुद्धा घातली आहे. या फोटोला नोराने कॅप्शन दिले आहे, मला खाली नदीत भेटा, जिथे आपण प्रत्येक तालावर डान्स करु जोपर्यंत उन्हामुळे पाणी आटत नाही. 15 मिलियन
अभिनेत्री नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने तिच्या डान्स स्टाइलमुळे बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.तिने आतापर्यंत तिची 'दिलबर', 'कमरिया', 'साकी साकी', 'एक तो कम जिंदगी' आणि 'गर्मी सॉन्ग' ही गाणी फारच गाजली. अजूनही तिची ही गाणी खासकरून तिच्या अफलातून डान्ससाठी पाहिली जातात. सिनेमात काम करण्याबाबत सांगायचं तर नोरा अजय देवगनसोबत 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये दिसणार आहे.