आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 07:52 IST2025-09-06T07:52:27+5:302025-09-06T07:52:35+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope - September 6, 2025, there will be profit in business, happiness and peace in the family, go on a trip to a beautiful place. | आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा

आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा

मेष -  आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास व प्रवास ह्यासाठी उत्तम आहे. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल. जुगार, शेअर्स यांत आज फायदा होईल. आणखी वाचा

वृषभ  -  आज आपण व्यापार वृद्धीवर आपले लक्ष केंद्रित कराल. नवीन योजना व प्रणालीच्या वापराने व्यापार प्रगतीच्या दिशेने वाढत जाईल. मात्र कामात यश मिळण्यास विलंब होईल. दुपार नंतर व्यापारातील परिस्थिती अनुकूल होईल.  आणखी वाचा

मिथुन  - आज आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकल्याने नैराश्यातून बाहेर पडू शकाल. अवैध कामे करून अडचणीत सापडण्याचा शक्यतेमुळे त्यापासून दूर राहणे हितावह होईल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. आणखी वाचा

कर्क  -   आज आपण एखाद्याशी भावनात्मक नात्याने जोडले जाल. आनंद व मनोरंजनात्मक प्रवृत्तीमुळे मन प्रफुल्लित राहील. त्यात मित्रांचे सहकार्य मिळाल्याने मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होईल. दुपार नंतर तब्बेत बिघडू शकते. आणखी वाचा 

सिंह -  आजचा दिवस व्यापार विस्ताराच्या दृष्टीने आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. व्यावसायिकांना त्यांच्या हाताखाली असणार्‍या लोकांकडून व्यावसायिक लाभ होतील. धनप्राप्ती संभवते. व्याज, दलाली इत्यादी मार्गांनी प्राप्तीत वाढ होऊन आर्थिक विवंचना दूर होईल. आणखी वाचा

कन्या -  वस्त्र व अलंकारांची खरेदी आनंददायी राहील. कलेत विशेष आवड निर्माण होईल. व्यापारातील विकासामुळे मनास आनंद होईल. आजचा दिवस व्यवसायासाठी अनुकूल आहे.  आणखी वाचा 

तूळ  -  आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. कुटुंबात वाद संभवतात. दुपार नंतर स्वास्थ्य लाभेल. सृजनशील गोष्टींकडे लक्ष द्याल. आणखी वाचा

वृश्चिक -  आजचा दिवस व्यावसायिकांना अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण होईल. स्थावर संपत्ती संबंधित कामाचे सुद्धा निराकरण होऊ शकेल. भावंडांशी जवळीक साधू शकाल. दुपार नंतर कामात प्रतिकूलता जाणवेल.  आणखी वाचा

धनु -  आज संभाव्य मतभेद टाळण्यासाठी उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिवसभर मनात गूढ व रहस्यमय विषयांचे विचार येतील. विद्यार्थ्यांना लेखन- वाचनात एकाग्रता ठेवावी लागेल. आणखी वाचा

मकर -   आज व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आज प्रत्येक कार्य विना विघ्न पार पडेल. दांपत्य जीवनातील वातावरणात कटुता निर्माण होईल. गूढ विषयांत गोडी निर्माण होईल. कार्यालयात आपला प्रभाव पडेल. दुपार नंतर मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. आणखी वाचा 

कुंभ  -  आज एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. कोर्ट- कचेरीच्या कामात यश मिळेल. पुण्यकार्यासाठी पैसा खर्च होईल. मनःशांतीसाठी केलेल्या प्रयत्नांत यशप्राप्ती होईल. आणखी वाचा 

मीन -  आज शेअर- सट्टा ह्यातून काही आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात सुख- शांती लाभेल. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाल. मित्रां कडून लाभ होईल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - September 6, 2025, there will be profit in business, happiness and peace in the family, go on a trip to a beautiful place.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app