आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 07:43 IST2025-09-27T07:39:48+5:302025-09-27T07:43:08+5:30

Daily Horoscope in Marathi, 27 September 2025: आजचा दिवस कसा जाणार, काय सांगतेय तुमची राशी? वाचा... 

Today's Horoscope, September 27, 2025: Today is not auspicious for buying land, house or vehicle. | आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही

आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही

मेष - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय व गूढ विषयांचे आकर्षण राहील. शक्यतो प्रवास टाळा. प्रवासात अनपेक्षित अडचणी उदभवतील. नवीन कार्ये हाती घेतल्यास त्यात सुद्धा अडचणी येतील.
आणखी वाचा  

वृषभ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. प्रकृती उत्तम राहील.  परदेशातून मनासारख्या बातम्या येतील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. वैवाहिक सौख्याचा आनंद उपभोगता येईल. अचानक धनलाभ संभवतो.
आणखी वाचा  

मिथुन - आजचा दिवस अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. धनप्राप्ती होईल. आवश्यक तेवढाच खर्च कराल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नोकरीत लाभ होतील.
आणखी वाचा  

कर्क - आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उदभवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षित झाल्याने एखाद्या संकटात सापडाल.  
आणखी वाचा  

सिंह - आज आपणास मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. नोकरीत स्त्री वर्गा पासून जपून राहा.
आणखी वाचा

कन्या - आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. गूढ व रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. एखाद्या विषयात प्रावीण्य प्राप्त होईल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांचा जोमाने प्रतिकार करावा लागेल.
आणखी वाचा  

तूळ - आज आपला हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. द्विधा स्थितीत अडकलेले मन कोणताही ठोस निर्णय घेऊ देणार नाही. आज शक्यतो महत्त्वाचा निर्णय घेऊ नये.
आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक प्रसन्नता वाटेल. प्रिय व्यक्तीशी सुसंवाद साधण्यात यश मिळेल. मंगल कार्याला उपस्थिती लावाल. धनलाभ व प्रवास संभवतात.
आणखी वाचा  

धनु - आजचा दिवस समस्याग्रस्त आहे. कुटुंबीयांशी चर्चा होईल व दुःखी व्हाल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. एखादा अपघात संभवतो. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. पैसा खर्च होईल.
आणखी वाचा

मकर - आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. व्यापार्‍यांची व्यापारात व नोकरदारांची नोकरीत प्राप्ती वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. नव्या वस्तूंची खरेदी होईल.
आणखी वाचा  

कुंभ - आज प्रत्येक काम सरळपणे होऊन त्यात यश सुद्धा मिळेल. नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मानसिक उत्साह जाणवेल. बढती व धनप्राप्ती संभवते. कौटुंबिक जीवन आनंदी राहून आपली मान - प्रतिष्ठा वाढेल.
आणखी वाचा  

मीन - आजच्या दिवसाची सुरवात भीती व उद्विग्नता ह्याने होईल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल.कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. संतती हे आजच्या चिंतेचे प्रमुख कारण राहील. अकारण पैसा खर्च होईल.
आणखी वाचा  

Web Title : आज का राशिफल, 27 सितंबर, 2025: संपत्ति के लिए शुभ दिन नहीं।

Web Summary : मिलाजुला दिन। सावधानी से आगे बढ़ें। कुछ राशियों को लाभ, कुछ को चुनौतियाँ। संपत्ति संबंधी बड़े फैसले लेने से बचें। कुछ के लिए पारिवारिक कलह और अप्रत्याशित खर्च का पूर्वानुमान। रिश्तों और वित्त को सावधानी से संभालें।

Web Title : Daily Horoscope, September 27, 2025: Not a good day for property.

Web Summary : Mixed day predicted. Proceed cautiously. Some signs see gains, others face challenges. Avoid major decisions regarding property. Family discords and unexpected expenses are foreseen for some. Handle relationships and finances carefully.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app